सांगली, दि. ११ ऑगस्ट २०२६ :- हातात तिरंगा, मनात राष्ट्रभक्ती आणि ओठांवर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष... अशा अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सांगली शहरात ३०० फूट लांबीच्या भव्य राष्ट्रध्वजासह आयोजित करण्यात आलेली ‘तिरंगा पदयात्रा’ अभूतपूर्व उत्साहात पार पडली. माजी सैनिक संघटना व त्यांचे कुटुंबीय, दामाणी हायस्कूलचे विद्यार्थी, युवक, महिला आणि सांगलीतील देशप्रेमी नागरिकांनी या पदयात्रेत प्रचंड संख्येने सहभागी होत शहरात राष्ट्रभक्तीची लाट निर्माण केली.
आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच आणि भाजप सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या उत्तम नियोजनाखाली या भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकता, अखंडता आणि ‘राष्ट्र प्रथम’ हा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश होता. पदयात्रेत ३०० फूट लांबीचा भव्य तिरंगा हे नागरिकांचे प्रमुख आकर्षण ठरले. हा अवाढव्य राष्ट्रध्वज हातात धरून चालणाऱ्या हजारो नागरिकांचे दृश्य अत्यंत प्रेक्षणीय आणि अभिमानास्पद असे होते. तिरंग्याच्या तीन रंगांनी सजलेले रस्ते आणि देशभक्तीपर घोषणांमुळे संपूर्ण सांगली शहर राष्ट्रभक्तीच्या रंगात रंगून गेले. ही पदयात्रा केवळ एका पक्षाचा उपक्रम न राहता संपूर्ण सांगलीकरांचा एक सामूहिक उत्सव बनला. तसेच, माजी सैनिकांचे कुटुंबीय, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या पदयात्रेला व्यापक जनसमर्थन लाभले.
"तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नसून तो आपल्या स्वाभिमानाचे, राष्ट्रीय एकात्मतेचे आणि अखंडतेचे अमर प्रतीक आहे. देशाच्या प्रगतीसाठी समाजात एकजूट असणे गरजेचे असून राष्ट्रहिताला आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. सांगलीकरांनी आज या ३०० फूट लांबीच्या तिरंगा पदयात्रेत दाखवलेला उत्स्फूर्त उत्साह हा सांगली शहराच्या देशभक्तीच्या उज्ज्वल परंपरेचे दर्शन घडवणारा आहे. या ऐतिहासिक पदयात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येक सांगलीकराचे मनापासून आभार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मानले."या भव्य तिरंगा पदयात्रेत माजी सैनिक विंग कमांडर प्रकाश नवले, मेजर रमेश चव्हाण यांच्यासह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय विशेष रूपाने उपस्थित होते. तसेच भाजप पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, माजी आमदार दिनकर पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दीपक बाबा शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई दिगडे, ज्येष्ठ नेते श्रीकांत शिंदे, भाजप नेत्या जयश्रीताई पाटील, जैन प्रकोष्ठ प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, मंजिरी गाडगीळ, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक विश्वजीत पाटील, नगरसेवक केदार खाडीलकर, उदय बेलवलकर, दरीबा बंडगर, संतोष पाटील, रवींद्र सदामते, नगरसेविका मनीषाताई कुकडे, मीनाक्षीताई पाटील, योगिताताई राठोड, रोहिणीताई पाटील, वर्षाताई सरगर, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार, मंडलाध्यक्ष रवींद्र वादवणे, राहुल नवलाई, संतोष सरगर, अमित देसाई, कृष्णा राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक, दामाणी हायस्कूलचे विद्यार्थी आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.