🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ''ज्या दिवशी आरएसएसची अभिव्यक्ती दाबण्याचा प्रयत्न होईल, त्या दिवशी मी त्यांचे रक्षण करेन, कारण त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.'' असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 
आमचा उद्देश कोणालाही रोखण्याचा नसून प्रत्येकाला 'फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन' असले पाहिजे, असे राहुल गांधींनी स्पष्ट केले. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.

राहुल गांधी पुढे म्हणाले, "विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडायची होती, त्यामुळे जंतरमंतरवर आंदोलन झालं. विद्यार्थी अडचणीत आहेत आणि बोलू इच्छितात, परंतु सरकार म्हणते - नाही. आम्ही जंतर-मंतरवर व्यवस्था कायम ठेवू. तुम्ही तुमचे म्हणणे मांडू शकत नाही. आज एक महिला माझ्याकडे आली होती, तिच्या मुलीवर ४ वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. ती रडत आहे, तिची व्यथा सांगू इच्छिते, पण यंत्रणा सांगते की माफ करा, आम्ही तुम्हाला बोलण्याची परवानगी देणार नाही, कारण यामुळे अस्वस्थता पसरू शकते."

संघाबद्दल राहुल गांधी काय म्हणाले?
"आता सरकारला एक गोष्ट समजली आहे की, हा देश व्यक्त होण्यापासून थांबणार नाही. भारतातील काही लोक भ्याड असल्यासारखं वागत आहेत. ३००० वर्षे जुना भारत समजून घेण्याची गरज नसून आजचा भारत समजून घेणे गरजेचे आहे. ज्या दिवशी आरएसएसची अभिव्यक्ती देशातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल, त्या दिवशी मी त्यांचे रक्षण करेन; कारण त्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे." अशा शब्दांत राहुल गांधींनी भावना व्यक्त केल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.