🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वदेशी व्हिला येथे रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचा भव्य स्नेहसोहळा; सामाजिक उपक्रमांची जोड

स्वदेशी व्हिला येथे रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचा भव्य स्नेहसोहळा; सामाजिक उपक्रमांची जोड


सांगली :- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस 'स्वदेशी व्हिला' येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अलोट उत्साहात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार व व्यावसायिक अशा सर्वच स्तरांतून दिवसभर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. या सोहळ्याला केवळ शुभेच्छांचे स्वरूप न राहता सामाजिक उपक्रमांची जोड मिळाल्याने वाढदिवस सेवाभावी भावनेने संपन्न झाला.

​राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती
आमदार व माजी मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार सुधीरदादा गाडगीळ, माजी आमदार नितीन शिंदे, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, जि. प. सदस्य प्रशांत अवधूत, मंजिरीताई गाडगीळ आणि माजी महापौर प्रशांत उर्फ पप्पू मजलेकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
​सहकार व शैक्षणिक क्षेत्राकडून सत्कार

​दक्षिण भारत जैन सभा : अध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन संजय शेटे, अनिल बागणे, महामंत्री शशिकांत राजोबा व  पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

​पतसंस्था क्षेत्र : शांतीसागर पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, वीराचार्य नागरी पतसंस्थेचे चेअरमन मोहन नवले, संचालक अजित भंडे, आनंद सागर गौरवाडे यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे संचालक लालासाहेब थोटे, वसंतराव नवले, डॉ. रमेश ढबू, चेतन पाटील, चंदन केटकाळे, कार्यकारी संचालक अनिल मगदूम व कर्मचाऱ्यांनी भेट घेतली.

​शिक्षण क्षेत्र : डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक डॉ. डी. डी. चौगुले आणि बिरनाळे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य तांबोळी सर यांच्यासह इतर शिक्षण संस्थांच्या प्रतिनिधींनी सत्कार केला.

​भाजप जैन प्रकोष्ठ व विविध संघटनांचा पुढाकार
भाजप जैन प्रकोष्ठचे पश्चिम विभाग प्रमुख प्रशांत गोंडाजी, सांगली जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महावीर तकडे आणि महिला विभागाच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला चौधरी यांच्यासह सांगली, कोल्हापूर व राज्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. जैन प्रकोष्ठच्या वतीने गणेशनगर येथे योग शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.

​याशिवाय केमिस्ट संघटना (अजित सकळे, सचिन सकळे, अविनाश पोरे, विवेक लडगे, महावीर खोत, विकास चौगुले), हॉटेल मालक-चालक संघटनेचे शैलेश पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा, जिव्हाळा ग्रुप, उद्योजक सागर वडगावे, बिल्डर राजेंद्र पोळ, सचिन संकपाळ, शितल पाटील, ॲड. अमोल चिमाण्णा, मदन पाटील, राहुल चौगुले, ॲड. जयंत नवले व सरकारी वकील ॲड. चिपरे यांनीही पाटील यांना शुभेच्छा दिल्या. 
सामाजिक उपक्रमांची जोड

वाढदिवसाचे औचित्य साधून कुपवाड येथील वृद्ध सेवा आश्रमात अन्नदान करण्यात आले. तसेच सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी ब्रह्मनाळ येथील हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. प्रत्यक्ष भेटीसह फोन, व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर नागरिक, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतकांनी रावसाहेब पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.