हा पोषक आणि सहज उपलब्ध असा पदार्थ असून, संतुलित आहारात त्याला महत्त्वाचे स्थान आहे. अंड्यांमध्ये उच्च दर्जाची प्रथिने, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D, कोलीन, सेलेनियम आणि शरीरासाठी आवश्यक असलेले विविध पोषक घटक आढळतात. त्यामुळे स्नायूंची ताकद, ऊर्जा, मेंदूचे कार्य आणि एकूण आरोग्य टिकविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. विशेषतः नाश्त्यामध्ये उकडलेले किंवा कमी तेलात बनविलेले अंडे घेतल्यास पोट दीर्घकाळ भरल्यासारखे राहण्यास मदत होते. मात्र, अंडी कशी आणि किती प्रमाणात खावीत, हे व्यक्तीचे वय, आरोग्य आणि एकूण आहारावर अवलंबून असते.
फिटनेसप्रेमी त्यांच्या रोजच्या प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी अनेकदा आहारात अंड्यांचा समावेश करतात. काही जण उकडलेली अंडी खाणे पसंत करतात; तर काही जण कच्ची अंडी अधिक फायदेशीर मानतात. त्यामुळे अंड्याच्या सेवनासंदर्भात विचारताना करताना कच्ची वा उक डलेलली अंडी यांपैकी कोणती अंडी अधिक फायदेशीर, हा प्रश्न निर्माण होतो. कच्चं आणि उकडलेलं यांपैकी कोणतं अंडं जास्त फायदेशीर आहे? प्रथिनांच्या बाबतीत कोणतं अंडं चांगलं आहे?संशोधनातून हे स्पष्टपणे दिसून आले आहे की, कच्च्या अंड्यामधील प्रथिने केवळ ५० टक्केच पचण्यायोग्य असतात. याचा अर्थ असा की, कच्च्या अंड्यातील प्रथिनांपैकी केवळ अर्धीच प्रथिने शरीराद्वारे सहजपणे पचवली जाऊन, वापरली जातात. उकडलेल्या अंड्यांमध्ये हे प्रमाण ९०-९५ टक्क्यांपर्यंत वाढते. अंडी शिजवल्याने त्यातील प्रथिने नष्ट होत नाहीत, उलट त्यांचे स्वरूप बदलते. उष्णतेमुळे प्रथिनांची रचना मोकळी होते, ज्यामुळे पाचक एंझाइम्सना ते अधिक सहजपणे विघटित करून पचवता येते. त्याच वेळी, कच्च्या अंड्यांमधील अॅव्हिडिन बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन बी७ शी बांधले जाऊन, त्याचे शोषण कमी करू शकते. अंडी शिजवल्याने हे अॅव्हिडिन मोठ्या प्रमाणात नष्ट होते, ज्यामुळे ही प्रक्रिया थांबते.
उकडलेले अंडे डोळ्यांसाठी फायदेशीर?
अंडी उकडण्याचा एक फायदा असा आहे की, त्यामुळे ल्युटीन आणि झियाझॅन्थिनसारख्या डोळ्यांसाठी आरोग्यदायी अँटिऑक्सिडंट्सची जैवउपलब्धता वाढते. याचा अर्थ शरीर ही पोषक तत्त्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकते आणि त्यांचा उपयोग करू शकते. हे दोन्ही कॅरोटीनॉइड्स डोळ्यांमध्ये आढळतात आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अंडी उकडलेली, ऑम्लेट किंवा भुर्जीच्या स्वरूपात खाणे सर्वोत्तम आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, सुरक्षितता आणि पचनाच्या दृष्टीने, शिजवलेली अंडी हा सर्वोत्तम पर्याय आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.