🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नानंतर सतत आजारी पडू लागला नवरदेव, महिन्याभरात बायकोवर संशय आला अन् घडलं भयंकर

लग्नानंतर सतत आजारी पडू लागला नवरदेव, महिन्याभरात बायकोवर संशय आला अन् घडलं भयंकर


एक अंगावर काटा आणणारी आणि खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुणाला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध रंगेहात पकडणे महागात पडले असून, पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून त्यालाच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील झाशी येथील ही घटना आहे.

लग्नानंतर सतत आजारी पडू लागला
तक्रारदार तरुणाचा विवाह 24 जून रोजी मध्य प्रदेशातील भांडेर येथील तरुणीशी हिंदू रितीरिवाजानुसार झाला होता. लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन आठवड्यांतच पत्नी आपल्याला चहा, दूध किंवा जेण्यातून गुंगीचे औषध देत असल्याचा संशय पतीला आला होता. आपण सतत आजारी पडत असल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती, असे त्याने पोलिसांना सांगितले.
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत

19 ऑगस्ट रोजी पत्नी घरात एकटी असताना एक तरुण भेटायला आल्याची माहिती शेजाऱ्यांनी पतीला दिली. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी तो तरुण पुन्हा घरी आल्याची कुणकुण लागताच पतीने घरी धाव घेतली. घराजवळ पोहोचून दरवाजा उघडताच पत्नी आणि तिचा प्रियकर आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहताच दोघांनी मिळून पतीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पतीच्या आरडाओरड्यानंतर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि पोलिसांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पतीने आपल्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेबद्दल भीती व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली असून, वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली जात असल्याचे सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.