नशामुक्त सांगलीसाठी २४ ऑगस्टला पदयात्रा; एसपी तुषार दोशींचे नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
सांगली : तरुणाईला व्यसनाधीनतेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि सांगली जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी एक व्यापक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
पालकमंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या संकल्पनेतून 'नशागुक्त सांगली' आणि 'सुरक्षित सांगली' या संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने 'नशामुक्ती निर्धार पदयात्रा
(#AntiDrugMarch) चे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता विश्रामबाग येथील नेमिनाथ नगरमधील वल्पद्रुम मैदान येथून या पदयात्रेचा भव्य शुभारंभ होणार आहे. शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती करत ही पदयात्रा पोलीस मुख्यालय सांगली येथे पोहोचेल, जिथे या मोहिमेचा शानदार समारोप केला जाईल. 'नशा नको, जीवन हवे!' असा सडेतोड संदेश देत समाजकंटकांवर आणि ड्रग्जच्या विरोधात एकजुटीने लढा देण्याचा निर्धार या पदयात्रेच्या माध्यमातून व्यक्त केला जाणार आहे.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी (भा.पो.से.) आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या बेट मार्गदर्शनाखाली सांगली पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनातर्फे या रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. या गोहिमेला राज्य सरकार आणि पोलीस महासंचालक कार्यालयाचे संपूर्ण पाठबळ मिळाले असून, विविध क्षेत्रांतील गान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
सांगलीतील सर्व सामाजिक संघटना, तरुण, महिला आणि सुजाण नागरिकांनी आपल्या शहराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि अमली पदार्थाच्या विरोधातील या चळवळीला बळ देण्यासाठी
सोमवारी सकाळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.