🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हातोडा-चाकूने प्राणघातक हल्ला: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा खून, पती गंभीर; सांगली एलसीबीकडून आरोपी २ तासांत जेरबंद​

हातोडा-चाकूने प्राणघातक हल्ला: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा खून, पती गंभीर; सांगली एलसीबीकडून आरोपी २ तासांत जेरबंद


सांगली :- एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विघ्नहर्ता शांती कॉलनी येथे आज सकाळी कचरा टाकण्याच्या क्षुल्लक वादातून शेजाऱ्याने घडवून आणलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तत्परता दाखवत आरोपीस अवघ्या दोन तासांत जेरबंद केले आहे.

​घटनेचा तपशील व गुन्हा दाखल

​विघ्नहर्ता शांती कॉलनी, कुपवाड येथे राहणाऱ्या मनाली मोहन केसरेकर यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेच्या सुमारास घरासमोर कचरा टाकण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपीसोबत वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर आरोपी फरीद अब्दुल शेख (वय ५२) याने घरातून हातोडा आणि चाकू आणून मनाली यांचे वडील मोहन नागाप्पा केसरेकर (वय ४५) यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार केला. तसेच आई मनीषा मोहन केसरेकर (वय ३५) यांच्या पोटात चाकूने वार करून दोघांनाही गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला. ​या प्रकरणी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (१), १०९ (१), ११५ (२), व ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस पथकाची धडक कारवाई
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस उप-निरीक्षक कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले.

तपासादरम्यान सहा. पोलीस उप-निरीक्षक सुभाष सूर्यवंशी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, संशयित आरोपी फरीद शेख हा मिरज-सांगली रस्त्यावरील वानलेसवाडी येथील बंद पडलेल्या मैत्रेय बिल्डिंगजवळ थांबला आहे. पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आरोपी फरीद शेख (सध्या रा. विघ्नहर्ता कॉलनी, कुपवाड; मूळ रा. रेणुका मंदिरासमोर, वानलेसवाडी, सांगली) यास ताब्यात घेतले.
​आरोपीची कबुली

​पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी फरीद शेख याने कचऱ्याच्या वादातून घरातून हातोडा व चाकू आणून मोहन केसरेकर व मनीषा केसरेकर यांच्यावर हल्ला केल्याची कबुली दिली. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
​ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि प्रशांत निशाणदार, पोउनि कुमार पाटील, अंमलदार सुभाष सूर्यवंशी, अतुल माने, सुशील मस्के, सागर लवटे, संदीप नलावडे, सुनील जाधव, विनायक सुतार, ऋतुराज होळकर व सुमित सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.