🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"पैसे जास्त झाले असतील तर..." शक्तीपीठ मार्गाविरोधात सांगलीत महाविकास आघाडीचा हल्लाबोल; भव्य मोर्चात नेते एकत्र

"पैसे जास्त झाले असतील तर..." शक्तीपीठ मार्गाविरोधात सांगलीत महाविकास आघाडीचा हल्लाबोल; भव्य मोर्चात नेते एकत्र

शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी झाले आहेत. सांगलीच्या क्रांतीसिंह नाना चौकातून शक्तिपीठ विरोधी समितीच्या वतीने मोर्चाला सुरुवात झाली.

या मोर्चामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत. विश्रामबाग मधून सुरू झालेल्या मोर्चामध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे.विश्रामबाग चौकातून सुरू झालेला हा मोर्चा सांगली जिल्हाधिकारी कार्यालय ठिकाणी आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

“शक्तीपीठचा घाट या सरकारने घातला. पण निवडणुकीच्या वेळी शिंदे साहेबांनी शक्तीपीठ रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते निवडणुकीसाठी होतं. रत्नागिरी मार्ग आहे. त्या रस्त्यावरून जायला माणसं नाहीत. पण या शक्तीपीठचा घाट यांनी घातला आहे. बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे” असं काँग्रेस नेते सतेज पाटील म्हणाले.

..तर आम्हाला सुचवा कसे खर्च करायचे

“पैसे जास्त झाले असतील तर 500-500 कोटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना द्यावेत. “1 लाख 10 हजार कोटी पैसे खर्च करण्याचा प्रश्न तुमच्या समोर असेल तर आम्हाला सुचवा कसे खर्च करायचे. कुणाला तर कॉन्ट्रॅक्ट मिळावं म्हणून हा रस्त्याचा घाट सुरू आहे. कोण सांगायला आलं जमीन दे तर ओळखायचं, त्याला दहा टक्के कमिशन मिळणार आहे” असा दावा सतेज पाटील यांनी केला.

लोक रस्त्यावर उतरू लागलेत

“सर्व स्तरातून शक्तिपीठ मार्गाला विरोध होत असून शक्तिपीठ रद्द झाला पाहिजे शक्तीपीठला समर्थन कोणाचे नाही. लवकरात लवकर शक्तीपीठ रद्द करावा यासाठी लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत. शक्तीपीठ रद्द नाही झाला तर असेच आंदोलन सुरू राहील” असा इशारा जयंत पाटील यांनी दिला आहे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.