🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापौर धीरज सूर्यवंशींचा दिलासादायक निर्णय: शाळा आणि व्यायामशाळांना घरपट्टी माफी!

महापौर धीरज सूर्यवंशींचा दिलासादायक निर्णय: शाळा आणि व्यायामशाळांना घरपट्टी माफी!


सांगली : धार्मिक स्थळे, शाळा, व्यायामशाळा, सेवाभावी संस्थांना घरपट्टी माफीचा निर्णय होईल. करपात्र क्षेत्र ठरवताना बिल्टअप्‌ एरियाऐवजी कार्पेट एरिया विचाराधीन आहे, अशी माहिती महापौर धीरज सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

घरपट्टीसंदर्भात शुक्रवारी महापौर समितीची बैठक झाली. त्यानंतर सूर्यवंशी म्हणाले, महापालिका क्षेत्रात १ लाख ६१ हजार मालमत्ताधारकांना भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी नोटिसा दिल्या गेल्या आहेत. त्यापैकी १९ हजार नागरिकांनी हरकती दाखल केल्या आहेत. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. यामध्ये अनेकांच्या तक्रारी या भूखंड, इमारतीचे मोजमाप चुकीचे केल्याच्या आहेत. 

वाढीव घरपट्टी मान्य नसल्याचे तसेच नागरी सुविधा नसताना वाढवलेली घरपट्टी मान्य नसल्याच्याही हरकती आहेत. घरपट्टी आकारताना जागेचे क्षेत्रफळ हे इमारतीच्या क्षेत्रफळातही समाविष्ट केल्याकडे संस्थांनी लक्ष वेधले आहे. कार्पेट एरियाऐवजी बिल्टअप्‌ एरियावर कर आकारणी केल्याबाबतही तक्रार नोंदवली आहे. एकूणच सर्व हरकती, तक्रारींवर सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.