पुणे : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी पुण्यामध्ये 'छात्रो की गूंज' हा खास कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी आणि खास करुन तरुणींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी राहुल गांधी यांनी स्टेजवर काही तरुणींना बोलावलं होतं. यावेळी एका पुणेकर तरुणीने महिलेच्या सुरक्षेबद्दल सांगितला अनुभव अंगावर शहारे आणणारा होता. या तरुणीने जे सांगितलं ते ऐकून राहुल गांधीही स्तब्ध उभे होते.
पुण्यात छात्रो की गूंज कार्यक्रमाला तुफान अशी गर्दी झाली. राहुल गांधी यांनी महिलांच्या सुरक्षेवर मुद्दा उपस्थितीत केला. १०० पैकी ८० टक्के महिलांवर अत्याचार होतोय. ५० टक्के महिला शिक्षण आणि कामाला रिजेक्ट करतात, सुरक्षेसाठी हा निर्णय घेतात. आर्थिक हिंसा हा एक प्रकार आहे. भारतीय प्रत्येक महिलेला सेफ्टीसाठी ७५०० रुपये खर्च याच्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. यापेक्षा जास्त होते, असं यावेळी राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या तरुणींनी आपल्या भावना स्टेजवर व्यक्त केल्या."आपण जेव्हा महिलेच्या सुरक्षेबद्दल विचार करतो तेव्हा खूप मोठा फरक आहे. मुलीवर बलात्कार झाला अशी बातमी वाचतो, तेव्हा तिच्यावर काय घडलं असेल हे तिलाच माहित असतं. त्यामुळे आमच्यामध्ये मुलांशी बोलण्याची भीती वाटते. मी जेव्हा ८ व्या वर्गामध्ये होते. माझ्या गावामध्ये शाळेतून घरी जात असताना ३ मुलं ही दारू प्यायलेली होती. सगळे विवाहित होते, ते आमच्या गावाशेजारीच राहणारे होते. त्यांनी आम्हाला घेरलं आणि छेड काढली. कमेराला हात लावणे, जवळ येणे, कमेंट करत होते. हा प्रकार पाहून आम्ही घाबरून पळून गेलो. घरी गेल्यावर मी वडिलांना सांगितलं. वडिलांनी मला आईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास सांगितलं. आम्ही पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तिघांना बेदम मारहाण केली."
'मुलीला शिकवू नका, इज्जत गेली'
"त्यानंतर माझ्या घरातील आणि गावातील लोक माझ्या विरोधात उभे राहिले. त्यांनी आता मुलीला शिकवू नका, असा सल्ला दिला. तिला घरात ठेवा, आपल्या घराची इज्जत गेली आहे, असं लोक सांगत होतं. पण, माझ्या वडिलांनी मला शिकवलं, पुण्यात पाठवलं. मी पुण्यात २०२० मध्ये आली होती. त्यावेळी पीएमपीएमएल बसमधून जात होती. त्यावेळी एका तरुणाने माझ्या कंबेराला हात लावला आणि बसमध्ये खेचलं. मी इतकी घाबरली पण हिंमत करून त्या मुलाच्या कानाखाली वाजववलं. पण एक मुलगीही बोलली नाही.
"मागील आठवड्यातच मी वसईमधून पुण्यात आली. पुणे स्टेशनवर एक दारूडा माणूस समोर आला आणि त्याने माझ्या ब्रेस्टला हात लावला. तिथेही महिला होत्या. पण, कुणीच बोललं नाही. महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे की, एका मुलीची छेड काढली तर कुणी बोलत नाही, तमाशा पाहत असता. त्यामुळे मला सांगायचं, अशा परिस्थितीत मुलीला मदत करा, तिची कुणी छेड काढणार नाही. यासाठी पुढे आलं पाहिजे.
महिलांनी कधीच स्वतंत्र्य राहू नये हा मनुस्मृतीचा डाव
इथं मी राजकारणावर बोलण्यासाठी आलो नाही, इथं मुलांची संख्या कमी आहे, पण मुलींची संख्या जास्त आहे. महिला या देशाची ताकद आहे. पिंजरा तोडा हाच आमच्या कार्यक्रमाचा अजेंडा आहे. महिला स्वातंत्र्य राहिल्या पाहिजे. प्रत्येक जण खास आणि युनिक आहे. पण महिलांनी कधीच स्वतंत्र्य राहू नये हा मनुस्मृतीचा डाव आहे. तुम्ही स्वत:शिवाय कुणालाही बांधील नाही तरुणांची लोकसंख्या ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.