🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सेम तुकाराम मुंढेंसारखं काम, कोण आहे प्रशासनात वेगळी ओळख, धाक निर्माण करणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब?

सेम तुकाराम मुंढेंसारखं काम, कोण आहे प्रशासनात वेगळी ओळख, धाक निर्माण करणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब?

महाराष्ट्रात ज्या प्रमाणे तुकाराम मुंढेंनी आपली वेगळी ओळख निर्माण केलीय, त्याप्रमाणे उत्तर प्रदेशात डॉ. रोशन जेकब यांनी आपला धाक निर्माण केला आहे. त्या उत्तर प्रदेश कॅडरच्या 2004 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.

त्यांची प्रशासकीय कामकाजाची पद्धत एकदम वेगळी आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. इंग्रजीत उच्च शिक्षण घेणाऱ्या डॉ. रोशन जेकब यांच्याकडे Phd ची पदवी आहे. तुकाराम मुंढे ज्या प्रमाणे आपल्या कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात, त्या प्रमाणे जेकब सुद्धा आपले प्रशासकीय निर्णय आणि जनहिताच्या मुद्यावर सक्रियपणे काम करण्यासाठी ओळखल्या जातात.

केरळच्या तिरुअनंतपूरममध्ये डॉ. रोशन जेकबयांचा जन्म झाला. तिथेचं त्यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं. डॉ. जेकब यांनी इंग्रजीतून BA, MA आणि Phd ची पदवी मिळवली. केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. पण उत्तर प्रदेशात एक IAS अधिकारी म्हणून काम करणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं. सुरुवातीला त्यांना इंग्रजी बोलण्यात अडचणी आल्या. सुरुवातीला खाणकाम विभागाच्या संचालिका म्हणून त्यांना जबाबदारी मिळाली होती. बेकायद खाणकाम रोखून कायदेशीर खाणकामाला प्रोत्साहन देण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती.

त्यामुळे त्या जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्या

IAS अधिकारी बनल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग बरेलीमध्ये जॉइंट मॅजिस्ट्रेट म्हणून झालेली. त्यानंतर कानपूर नगर, मेरठ आणि अन्य जिल्ह्यात प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळल्या. अनेक जिल्ह्यात त्यांनी डिस्ट्रीक्ट मॅजिस्ट्रेट म्हणूनही काम केलं. 2017 साली उत्तर प्रदेश खाणकाम विभागाच्या संचालिका बनणाऱ्या त्या पहिल्या महिला IAS ठरल्या. दीर्घकाळ त्यांनी लखनऊच्या डिवीजनल कमिशनर म्हणून काम केलं. मायनिंग विभागाच्या त्या संचालिका होत्याच. पण डिवीजनल कमिशनर म्हणून त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. सप्टेंबर 2025 पर्यत त्या या पदावर होत्या. नंतर त्यांची बदली फूड सेफ्टी अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन खात्यात कमिशनर म्हणून झाली. कोविड-19 च्या काळात प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची एक वेगळी छाप उमटवली. त्यामुळे त्या जास्त प्रसिद्धीच्या झोतात आल्या.

वेगवेगळ्या कॅडरचे अधिकारी

तुकाराम मुढे आणि डॉ. रोशन जेकब वेगवेगळ्या कॅडरचे अधिकारी आहेत. पण दोघेही आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. दोघांच्या कामकाजाची जी पद्धत आहे, त्यामुळे UPSC च्या उमेदवारांसमोर दोघेही चांगले आदर्श आहेत. पारदर्शकतेला दोन्ही अधिकाऱ्यांचं पहिलं प्राधान्य आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.