🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?


आयटीआय (ITI) पूर्ण करून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. मुंबई महानगरपालिकेच्या विविध तांत्रिक विभागांमध्ये तब्बल ६१२ शिकाऊ उमेदवारांची  एका वर्षाच्या करारावर भरती केली जाणार आहे. या भरतीमुळे तरुणांना पालिकेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मागील अनेक वर्षांपासून प्लंबर, वायरमन, फिटर आणि सुतार यांसारख्या महत्त्वाच्या तांत्रिक पदांवर नवीन भरती झाली नव्हती. त्यामुळे पालिकेची अनेक कामे रखडली होती. अखेर ११ वर्षांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर व्यवसाय आणि प्रशिक्षण संस्थेच्या सर्वेक्षणानुसार या ६१२ पदांवर प्रत्यक्ष भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

स्टायपेंड आणि कामाचे स्वरूप
प्रशिक्षण कालावधी: निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल.

दरमहा स्टायपेंड: प्रशिक्षणादरम्यान उमेदवारांना ट्रेडनुसार दरमहा १७,००० रुपये ते १९,००० रुपयांपर्यंत स्टायपेंड (विद्यावेतन) दिले जाणार आहे.

प्रमाणपत्र: १ वर्षाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर उमेदवारांना अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल.

कामाचे ठिकाण: महापालिकेची विविध खाती आणि पालिका रुग्णालयांमध्ये या उमेदवारांची सेवा घेतली जाईल.
कोणत्या ट्रेडसाठी किती जागा?

या भरतीमध्ये सर्वाधिक जागा कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी आहेत. विविध ट्रेडनुसार उपलब्ध जागांची माहिती खालीलप्रमाणे आहे-

कॉम्प्युटर ऑपरेटर: १५४ जागा
डिझेल मॅकेनिक: ८७ जागा

प्लंबर: ६६ जागा

फिटर: ५७ जागा

इलेक्ट्रिशियन: ४० जागा

मशिन मोटर व्हेइकल: ३९ जागा

वायरमन: ३३ जागा

मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन: २८ जागा

कारपेंटर (सुतार): २० जागा

वेल्डर: १६ जागा

पेंटर जनरल: १३ जागा

फ्रिज आणि एसी दुरुस्ती: ६ जागा

पंप ऑपरेटर: ३ जागा

(याशिवाय सिव्हिल ड्राफ्ट्समन, टर्नर आणि तंत्रज्ञ चालक यांसारख्या इतर तांत्रिक पदांचाही यात समावेश आहे.)
अर्ज आणि भरती प्रक्रिया

या सर्व तांत्रिक पदांसाठीची अधिकृत भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. आयटीआय पास झालेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मुंबई महापालिकेत काम करण्याचा आणि उत्तम अनुभव घेण्याचा हा सुवर्णयोग आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.