🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"AI मानवाचा संहार करणार?" OpenAI अन् Anthropic च्या मुख्य संशोधकाचा राजीनामा; दिला विनाशाचा इशारा!

​"AI मानवाचा संहार करणार?" OpenAI अन् Anthropic च्या मुख्य संशोधकाचा राजीनामा; दिला विनाशाचा इशारा!


ओपन एआय आणि अँथ्रोपिक या दोन्ही एआय क्षेत्रातील दिग्गज कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव असलेल्या एका संशोधकाने एआयबाबत गंभीर इशारा देत अँथ्रोपिकमधून राजीनामा दिला आहे. जेकब कॉक्सन नाव असलेल्या या संशोधकाने, अँथ्रोपिक आणि तिच्या स्पर्धक कंपन्या एआयमध्ये प्रगती घडवून आणत असले तरी ते जबाबदारीने वागत नसल्याच्या चिंतेमुळे राजीनामा दिल्याचे स्पष्ट केल आहे.

अँथ्रोपिक आणि ओपनएआय या दोन्ही कंपन्यांमध्ये तीन वर्षे संशोधन केल्याचा दावा करणाऱ्या जेकब कॉक्सन यांनी नुकतेच 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, या दोन्ही कंपन्या सुरक्षेपेक्षा शक्य तितके प्रगत मॉडेल विकसित करून एकमेकांना आणि जागतिक स्पर्धकांना हरवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. या तंत्रज्ञानावरील मानवी नियंत्रण सुटण्याची शक्यता असल्याबद्दल व्यक्त होणाऱ्या चिंतांनाही त्यांनी दुजोरा दिला आहे.

एआय मानवी जीवनाला धोका

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, कॉक्सन म्हणाले की अँथ्रोपिक आणि त्यांची प्रमुख प्रतिस्पर्धी ओपनएआय 'स्वतःमध्ये सुधारणा करणाऱ्या Superintelligence प्रणालीच्या दिशेने थेट शर्यत करत आहेत आणि आपल्या जीवाशी जुगार खेळत आहेत." त्यांनी असा इशारा दिला की एआयवर काम करणाऱ्या काहींना वाटते की या दशकाच्या अखेरीस एआय मानवी जीवनाला धोका निर्माण करू शकते. 
एआय विकसित करणाऱ्या लोकांची अशी ठाम समजूत आहे की, या दशकाच्या अखेरीस ते आपल्या सर्वांचा जीव घेऊ शकते. ही काही मार्केटिंगची चाल नाही. उलट, अनेक वरिष्ठ अधिकारी आणि संशोधक प्रसारमाध्यमांसमोर बोलताना संयत आणि समंजस वाटेल अशा शब्दांत आपली मते मांडतात. पण खाजगीत मात्र तेच लोक भीती व्यक्त करताना मी पाहिले आहे. - जेकब कॉक्सन, ओपन एआय आणि अँथ्रोपिकचे माजी संशोधक 'या तंत्रज्ञानाच्या शक्तीला कमी लेखू नका. हे लवकरच अशी 'सुपरह्युमन' प्रणाली बनेल जी कशालाही हॅक करू शकेल, कोणत्याही क्षेत्रात रातोरात क्रांती घडवून आणू शकेल आणि वास्तविक सत्ता व संसाधने हस्तगत करू शकेल. आपण सर्वांनीच या प्रत्येक क्षेत्रातील प्रगती पाहिली आहे', असे कॉक्सन पुढे म्हणाले.'
अशा प्रकारची चिंता जाहीरपणे व्यक्त करणारे कॉक्सन हे एआय क्षेत्रातील पहिलेच व्यक्ती नाहीत. अलिकडच्या वर्षांत अँथ्रोपिक आणि ओपनएआय या दोन्ही कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या चिंतेमुळे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. अँथ्रोपिकच्या दोन विद्यमान कर्मचाऱ्यांनीही कॉक्सन यांच्या पोस्टला सहमती दर्शवत प्रतिसाद दिला.

एआय कंपन्यांनाही भीती

स्वतः एआय कंपन्यांनीही काही वेळा या तंत्रज्ञानामुळे मानवजातीला निर्माण होणाऱ्या धोक्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र साशंक दृष्टिकोन असलेल्यांनी याकडे त्या कंपन्यांची उत्पादने 'सर्वशक्तिमान' भासवण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून पाहिले आहे. कॉक्सन यांनी स्पष्ट केले की, आपल्या पोस्टमध्ये त्यांनी मांडलेली भीती ही काही 'मार्केटिंग स्टंट' नाही.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.