🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दलालांचा धुमाकूळ: रुग्णांचे रक्त-लघवी नमुने पळवणारी टोळी सक्रिय; इन-हाऊस लॅब टेक्निशियनच 'गोरखधंद्या'चा मास्टरमाईंड?

सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दलालांचा धुमाकूळ: रुग्णांचे रक्त-लघवी नमुने पळवणारी टोळी सक्रिय; इन-हाऊस लॅब टेक्निशियनच 'गोरखधंद्या'चा मास्टरमाईंड?


सांगली :- गोरगरीब आणि गरजू रुग्णांचा एकमेव आधार असलेल्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्णांच्या आरोग्याशी आणि खिसा कापण्याचा उघडउघड खेळ सुरू आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रग्ण दाखल झाल्या पासून त्याच्या डिस्चार्ज पर्यन्त बरेच अधिकारी कर्मचारी आप आपल्यापरीने सर्वजण त्याच्या नातेवाईकांवर गिधाडासारखे तुटून पडतात.  
"ह्या लॅबला जा, त्या लॅबला जा" असं सांगत नातेवाईकांना धमकावणे आणि दिशाभूल करणे हे दररोजचेच झाले आहे. त्यामुळे रुग्णाच्या प्राणापेक्षा खाजगी लॅबचे कमिशन कसे मिळेल, यातच या टोळीला रस असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
 

लॅब टेक्निशियनच रॅकेटचा सूत्रधार!

या संपूर्ण काळ्या कारभारात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे स्वतः सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधीलच एक प्रयोगशाळा सह्यायक  या रॅकेटमध्ये थेट सामील असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. हा कर्मचारी सिव्हिल हॉस्पिटलच्या शासकीय लॅबमध्येच कार्यरत असून, डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक साटेलोटे करून सर्व प्रकारच्या रक्त व लघवीच्या नमुन्यांचे (सॅम्पल्स) कलेक्शन स्वतः करतो. शासकीय लॅबमध्ये तपासण्या करण्याऐवजी हे सॅम्पल्स स्वतःच्या खाजगी लॅबमध्ये नेऊन तिथे रिपोर्ट तयार केले जातात आणि त्या बदल्यात रुग्णांच्या नातेवाईकांकडून मोठी रक्कम उकळली जाते.

वरिष्ठांचे सोयीस्कर दुर्लक्ष; नागरिकांमध्ये प्रचंड संताप
सिव्हिल हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी हा 'गोरखधंदा' रुग्णालय प्रमुखच्या आशीर्वादाने उघडपणे सुरू असताना वरिष्ठ अधिकारी मात्र डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधून बसले आहेत. या भ्रष्टाचारामुळे शासकीय रुग्णालयातील मोफत व सवलतीच्या दरातील वैद्यकीय सुविधांचा बोजवारा उडाला आहे. गोरगरीब रुग्णांच्या तळतळाटाची आणि जिवाची कोणतीही पर्वा न करता केवळ पैशाच्या हव्यासापोटी सुरू असलेला हा प्रकार तातडीने थांबवण्याची गरज आहे.

​शासकीय यंत्रणेला काळिमा फासणाऱ्या या भ्रष्ट कर्मचाऱ्यावर आणि त्याच्या पाठीशी असणाऱ्या टोळीवर प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी आता सांगलीच्या नागरिकांमधून केली जात आहे. अशा अनेकबाबींची वैध्यकीय शिक्षण विभागाच्या व्हिजिलन्स समिती मार्फत चौकशी होण्याची मागणी गोर - गरीब रुग्ण व नातेवाईक करत आहेत.
क्रर्मश...........


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.