🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उघड्या घरातील ६.३० लाखांचे सोने लांबवणारा चोरटा विट्यातून गजाआड; सांगली एलसीबीची धडक कारवाई​

उघड्या घरातील ६.३० लाखांचे सोने लांबवणारा चोरटा विट्यातून गजाआड; सांगली एलसीबीची धडक कारवाई


सांगली :- तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील एका बंद/उघड्या घरातून ४२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी), सांगलीच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. सिद्धार्थ संजय गुरव (वय २०, रा. साळसिंगे रोड, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा संपूर्ण चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

​MSEDCL कार्यालयासमोर रचला जाळा

गव्हाण येथील रोहन लक्ष्मण गुरव यांच्या घरात १ ते २८ ऑगस्ट दरम्यात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे निर्देश दिल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पीएसआय महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात केले होते. 

​२ सप्टेंबर रोजी तासगाव हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार सागर टिंगरे, दरिबा बंडगर व सतीश माने यांना गोपनीय बातमीदाराद्वारे बातमी मिळाली की, संशयित आरोपी तासगाव-भिलवडी बायपास रोडवरील एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार आहे. पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित सिद्धार्थ गुरव याला ताब्यात घेतले.
​झडतीत सापडले संपूर्ण दागिने

संशयिताची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात सोन्याचे दागिने आढळून आले. कसून चौकशी केली असता त्याने गव्हाण येथील रोहन गुरव यांच्या घरातून हे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ६ लाख ३० हजार रुपये किमतीचे ४२ ग्रॅम वजनाचे दागिने (ज्यामध्ये नेकलेस, चेन, मिनीगंठण, कानातील कर्णफुले, अंगठी आणि बदाम) जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पीएसआय महादेव पोवार, सपना गराडे, सागर टिंगरे, दरिबा बंडगर, सतीश माने, अनिल कोळेकर, नागेश खरात, सागर लवटे, अमर नरळे, मोतीराम खोत, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, संदीप नलावडे, उदय माळी, अमीरशा फकीर, महादेव नागणे, प्रकाश पाटील, सोमनाथ गुंडे, विक्रम खोत, केरूबा चव्हाण व चालक गणेश शिंदे यांच्या पथकाने केली. आरोपी व जप्त माल पुढील तपासासाठी तासगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.