🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​सोनं होणार सामान्यांच्या आवाक्याबाहेर? दर थेट १.५० लाखांवरून ३.४७ लाखांवर जाण्याचा तज्ज्ञांचा खळबळजनक अंदाज!

सोनं होणार सामान्यांच्या आवाक्याबाहेर? दर थेट १.५० लाखांवरून ३.४७ लाखांवर जाण्याचा तज्ज्ञांचा खळबळजनक अंदाज!


प्रचंड चढ उतार झाल्यानंतर आता सोन्याचे दर 1.50 लाखाच्या आसपास स्थिरावला आहे. अशातच आता जेफरीजचे ग्लोबल हेड ऑफ इक्विटी स्ट्रॅटेजी, ख्रिस वूड यांच्या यांनी वर्तवलेल्या अंदाजामुळे खळबळ उडाली आहे. येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ होऊ शकते. सोन्याचा दर प्रति औंस 10,00 डॉलर्सपर्यंत वाढू शकतो. ही दरवाढ सध्याच्या दरापेक्षा अंदाजे 130 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकते. 1.50 लाखावरुन सोन्याचा दर 3.47 लाखावर जाऊ शकतो.

वूड यांनी यांनी एका मुलाखतीत सोन्याच्या दराबाबत अंदाज वर्तवला आहे. प्रति औंस 10,000 डॉलरची पातळी गाठणे शक्य असले तरी अमेरिकन बाँड यील्ड्स नियंत्रित करण्याच्या प्रयत्नांमुळे डॉलर कमकुवत होऊ शकतो, ज्याचा फायदा सोन्याला होऊ शकतो. जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या किमतीने प्रति औंस 5,589 डॉलर्सचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून त्यात काहीशी घसरण झाली आहे. 17 सप्टेंबर 2026 अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आपला बेंचमार्क व्याजदर 25 बेसिस पॉइंट्सने वाढवल्यानंतर, सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याची किंमत 0.88 टक्के ने घसरून प्रति औंस 4,348.90 डॉलर्सवर आली. 

जर सोन्याचा दर सध्याच्या सुमारे 4,349 डॉलर प्रति औंसवरून 10,000 पर्यंत पोहोचला, तर सोन्याच्या दरात 130 टक्के वाढ होऊ शकते. ही वाढ सध्याच्या पातळीच्या तुलनेत अंदाजे 2.3 पटींपेक्षा जास्त असू शकते. भारतात MCX वर सोन्याचा भाव सध्या प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.51 लाख आहे. जर भारतातील सोन्याच्या भावात डॉलरमधील सोन्याच्या भावाप्रमाणे अंदाजे 130 टक्के वाढ झाली, तर MCX वरील भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 3.47 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
अमेरिकन बॉण्ड यील्ड्सचा काय परिणाम होणार?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडे व्याजदर लक्षणीयरीत्या वाढवण्याची क्षमता नाही. अमेरिकेची वित्तीय तूट इतकी मोठी आहे की देशाला वाढलेले बॉण्ड यील्ड्स हाताळणे कठीण जाईल. सरकारी खर्चाशी संबंधित हक्क आणि लाभांमध्ये कपात करण्याची "राजकीय इच्छाशक्ती" अमेरिकेकडे नाही, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत, अमेरिकन अधिकाऱ्यांना बॉण्डवरील परतावा कमी करण्याचा प्रयत्न करावा लागू शकतो असे मत वुड यांनी व्यक्त केले आहे.

डॉलर कमकुवत झाल्यास सोन्याला फायदा
जर अमेरिकेने बॉण्ड यील्ड्सवर नियंत्रण ठेवले, तर डॉलर दीर्घकाळ कमकुवत होऊ शकतो. ही बाब उदयोन्मुख बाजारपेठेतील शेअर्स आणि सोन्यासाठी दिलासादायक ठरू शकते. भारतीय कुटुंबांकडे असलेल्या मोठ्या प्रमाणात सोन्यामुळे, डॉलर दीर्घकाळ कमकुवत राहिल्यास भारताला विशेष फायदा होऊ शकतो असे वुड म्हणाले. भारतातील सुवर्ण कर्ज बाजारपेठ झपाट्याने वाढत असून, या बाजारपेठेत हळूहळू घरगुती सोन्याचा वापर होऊ लागला आहे. जर सोन्याचा भाव प्रति औंस 10,000 डॉलरवर पोहोचला, तर भारतीय कुटुंबांच्या ताळेबंदात असलेल्या सोन्याच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर मुद्रीकरण केले जाऊ शकते. याचा अर्थ असा की, कुटुंबांकडे असलेले सोने अधिक आर्थिक व्यवहार आणि कर्जांसाठी वापरले जाऊ शकते.
फेडच्या धोरणात बदल झाला तर बाजारात तेजी येऊ शकते

जर यूएस फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी प्रत्यक्षात चलनविषयक धोरण कडक राबवले आणि व्याजदर वाढीचे दीर्घ चक्र सुरू केले, तसेच फेडची ताळेबंद लक्षणीयरीत्या कमी केली, तर त्यांचे अंदाज चुकीचे ठरू शकतात. अशा कठोर धोरणामुळे डॉलर मजबूत होईल. यामुळे बॉण्ड बाजारात मोठी तेजी येऊ शकते. याउलट, यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव येईल आणि अमेरिकेच्या शेअर बाजारावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, डॉलर घसरल्यास सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. शिवाय, डॉलर दीर्घकाळ कमकुवत राहिल्यास भारताला सर्वाधिक फायदा होईल, कारण भारतीय कुटुंबांकडे मोठ्या प्रमाणात सोने आहे. 18 सप्टेंबर रोजी एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 516 रुपयांनी वाढून 1,53,497 रुपयांवर पोहोचला. दुसरीकडे, चांदीचा भाव 2,565 रुपयांनी वाढून 2,40,770 रुपयांवर पोहोचला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.