🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली पोलिसांची मोठी कारवाई: सराईत गुन्हेगार अंकुश केरीपाळे १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार​

सांगली पोलिसांची मोठी कारवाई: सराईत गुन्हेगार अंकुश केरीपाळे १ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

सांगली :-गणेशोत्सव काळात शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सांगली पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सांगली शहर आणि संजयनगर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अंकुश आनंदराव केरीपाळे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, रविवार पेठ, माधवनगर, सांगली) याच्यावर तडीपारीची कारवाई करत त्याला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

​अंकुश केरीपाळे याच्यावर २०१५ पासून विनयभंग, अॅट्रॉसिटी (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा), शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि घरफोडी यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे सांगली शहर व संजयनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला सतत बाधा येत होती.

​या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) (ब) नुसार त्याला हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी निरज यांच्याकडे सादर केला होता. 

सुनावणीअंती प्रांताधिकाऱ्यांनी केरीपाळे याला एका वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. १५ सप्टेंबर २०२६ रोजी या आदेशाची बजावणी करण्यात आली असून, दिलेल्या ४८ तासांच्या मुदतीनंतर त्याला जिल्ह्याबाहेर हलवण्यात आले आहे.

​ पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक संतोष यादव, पोलीस अंमलदार शिंदे, ननवरे, कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील तांबोळी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.