🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सांगलीत रविवारी 'सलोखा परिषद'; विचारवंत व कार्यकर्त्यांचे एकत्र येण्याचे आवाहन

अनुसुचित जाती उपवर्गीकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सांगलीत रविवारी 'सलोखा परिषद'; विचारवंत व कार्यकर्त्यांचे एकत्र येण्याचे आवाहन


​सांगली :- महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरण करण्यासंदर्भात सरकारच्या विचाराधीन असलेल्या निर्णयामुळे सध्या समाजात दोन वेगवेगळे प्रवाह पाहायला मिळत आहेत. काही घटकांकडून या निर्णयाचे समर्थन केले जात आहे, तर काही घटकांकडून यास विरोध दर्शवला जात आहे. या मतभेदांमुळे अनुसूचित जाती घटकांमध्ये अंतर्गत तेढ निर्माण होत असल्याचे चित्र समोर येत आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर महापुरुषांवर चिखलफेक करण्याचे गैरप्रकारही घडत असून, ही बाब अत्यंत गंभीर आणि चीड आणणारी आहे.

​समाजातील ही दुफळी व तेढ थांबवून विचारांची एकता आणि सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी सांगलीतील चळवळीतील कृतिशील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन 'सलोखा परिषद' आयोजित केली आहे. ही परिषद रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजता, खिलारे मंगल कार्यालय (आकाशवाणी केंद्रासमोर), सांगली येथे पार पडणार आहे.
​विचारवंत व अभ्यासांचे मार्गदर्शन

या परिषदेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणून निकोप चर्चेचा मार्ग सुकर केला जाणार आहे.

​उद्घाटक: फुले, शाहू, आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक मा. राम कांबळे (सर) यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल.

​अध्यक्ष स्थान: परिषदेच्या अध्यक्षस्थानी मा. प्रा. गौतमीपुत्र कांबळे (सर) हे असतील.

प्रमुख मार्गदर्शक: प्रसिद्ध विचारवंत मा. सचिन बगाडे उपस्थितांना प्रमुख मार्गदर्शन करतील.
​या परिषदेस सांगली परिसरातील सामाजिक व पुरोगामी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते मा. सुरेश दुधगांवकर, मा. कैलास काळे, मा. आकाश तिवडे, मा. गॅब्रिएल तिवडे, मा. सुभाष वायदंडे, मा. दादासो कस्तुरे, मा. नितीन कांबळे, मा. स्नेहल सावंत, मा. किरणराज कांबळे, मा. महेंद्र करूणासागर, मा. सुधाकर वायदंडे, मा. शुभांगी कांबळे, मा. अर्जुन कांबळे, मा. शेवंताताई वाघमारे, मा. जगन्नाथ ठोकळे, डॉ. सचिन सवाखंडे, प्रा. लक्ष्मण मोरे, मा. दिलीप सासणे, मा. मिलिंद सावंत, मा. सचिन आवळे, डॉ. नितीन गोंधळे, मा. संगिता शिंदे, मा. सुजाता पवार, मा. विकास भंडारे आणि मा. रोहित शिवशरण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

​महापुरुषांच्या वैचारिक वारशाचा सन्मान राखत समाजात समलोखा व भाईचारा टिकवून ठेवण्यासाठी या सलोखा परिषदेस नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिषद यशस्वी करावी, असे आग्रहाचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
​

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.