🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ

९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पोलिस दलात खळबळ


उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथे फटाक्यांच्या काखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटामधील मृतांचा आकडा १५ वर पोहचला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कौशांबी येथे लोकवस्तीत हा फटक्यांचा कारखाना बेकायदेशीररित्या चालवला जात होता. या प्रकरणात आता प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ९ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली.

कौशांबी येथे फटाक्याच्या कारखान्यात सोमवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास स्फोट झाला होता. या स्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १० मुलांचा समावेश आहे. त्याचसोबत चार पुरूष आणि एका महिलेचा मृत्यू झाला असून हे चार मृत एकाच कुटुंबातील आहेत. दोन कुटुंबातील तीन सदस्यांचा समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक जण व्हेंटिलेटरवर आहे.

या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी ९ पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निष्काळजीपणाप्रकरणी एक पोलिस निरीक्षक, ६ पोलिस उपनिरीक्षक आणि २ हवालदार यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिस महानिरीक्षक अजय कुमार मिश्रा यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या २ वर्षांपासून पिपरी पोलिस ठाण्यात आणि चौकीवर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

बुंदीगावात असलेला हा फटाक्याचा कारखाना बेकायदेशीररित्या चालवण्यात येत होता. हा कारखाना लोकवस्तीच्या अगदी शेजारीच होता. घटनेच्या वेळी कारखान्यात २० कामगार काम करत होते. घटनास्थळावरच ७ जणांचा मृत्यू झाला होता. काही जखमींनी उपचारादरम्यान प्राण सोडले. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसाठी एक आव्हान बनले होते. पण नंतर मृतांची ओळख पटली. या स्फोटामुळे कारखान्याच्या आसपासच्या घरांची पडझड झाली. त्यामुळे मोठे नुकसान झाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.