🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार!’ भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचा पिंपरी-चिंचवड पालिकेत थरार!

‘त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार!’ भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविकेचा पिंपरी-चिंचवड पालिकेत थरार!


पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा कायम चर्चेचा विषय असतानाच आता सत्ताधारी पक्षातील एका नगरसेविकेने ठेकेदाराला टोकाची धमकी देणारे केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार, असे धक्कादायक विधान पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे  यांनी केले आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोरे यांनी हे वक्तव्य केले आणि सभागृहासह शहरात चर्चेला उधाण आले आहे. लोकप्रतिनीधीच कुख्यात गुन्हेगारांसारखी भाषा करायला लागले आणि कायदा हातात घेण्याची धमकी देऊ लागले तर कसे होणार, असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक स्मशानभूमींमधील विद्युत दाहिनी नादुरुस्त असल्याचा मुद्दा शैलजा मोरे यांनी बुधवारी सभागृहातील सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या दाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिका आयुक्त आणि संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी शैलजा मोरे यांचा पारा चांगलाच चढला होता. याच मुद्द्यावरून मोरे यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. यापुढे या विषयावर सर्वसाधारण सभेत चर्चा होणार नाही. 

प्रशासनाने संबंधित ठेकेदारांची नावं जाहीर करावीत, अशी मागणी शैलजा मोरे यांनी केली. "त्यानंतरही ठेकेदारांनी सुधारणा केली नाही तर मी त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार", असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले. शैलजा मोरे यांच्या या वक्तव्यापूर्वीच बुधवारची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला होता. त्यामुळे मोरे यांच्या वक्तव्याच्यावेळी विरोधक सभागृहात उपस्थित नव्हते. त्यांच्या या वक्तव्याकडे सत्ताधारी भाजपनेही दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळाले. मात्र, ही बातमी बाहेर आल्यानंतर राजकीय लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.