🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! शिशू आहार बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा दणका; ५ कडक नियमांनी बेकायदेशीर बाजाराची उतरवली मस्ती

तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडमध्ये! शिशू आहार बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा दणका; ५ कडक नियमांनी बेकायदेशीर बाजाराची उतरवली मस्ती


FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता आपला मोर्चा थेट 'बेबी फूड' (शिशू आहार) बनवणाऱ्या बड्या कंपन्यांकडे वळवला आहे. (बाजारात मिळणाऱ्या डबाबंद दुधामुळे आणि आहाराच्या चुकीच्या जाहिरातींमुळे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं तुकाराम मुंढे म्हणाले.

मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी नवजात बालकांच्या आहाराबाबत कठोर आदेश लागू केला आहे. या नव्या निर्णयामुळे मुलांसाठी आहार बनवणाऱ्या उत्पादक, ब्रँड मालक आणि ई-कॉमर्स विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

६ महिन्यांपेक्षा लहान मुलांना केवळ आईचेच दूध मिळाले पाहिजे. आईचे दूध सर्वोत्तम, दुसरं काहीच नाही असे तुकाराम मुंढे म्हणाले. त्यांनी बेबी फूडच्या पॅकेजिंगवर 'आई आणि बाळाचा फोटो' वापरण्यावर थेट बंदी घातली आहे. त्यासोबतच, उत्पादनावर "आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम आहे" हे छापण्यासह ५ कडक नियमांची अंमलबजावणी अनिवार्य केली आहे. नियमांचे उल्लंघन करून जाहिराती करणाऱ्या किंवा डॉक्टरांच्या नावाने मोफत सॅम्पल्स वाटणाऱ्या कंपन्यांवर आता ३ ते १० लाख रुपयांचा दंड आणि थेट तुरुंगवासाची कारवाई होईल असा इशारा दिला.

तुकाराम मुंढे म्हणाले, जेव्हा आपण 'सेव्ह फूड, सेव्ह ड्रग्स' म्हणतो, तेव्हा लोकांना अन्न आणि औषधे पूर्णपणे सुरक्षित आणि शुद्ध मिळायलाच हवीत. एफडीएने आतापर्यंत २२ नियमावली आणि ११ कडक आदेश जारी केले आहेत. यापूर्वी २२ महिने ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी शाळांच्या संदर्भात नियम केले होते. आता २ वर्षांखालील नवजात बालकांच्या आहाराबाबत राज्यभरात नवा आदेश लागू करण्यात आला आहे.

आत्ताच हा आदेश काढण्याची गरज का भासली?

बाजारात मिळणाऱ्या बेबी फूड आणि फॉर्म्युला मिल्कच्या पॅकेट्सवर 'आईचे दूध हेच शिशुसाठी सर्वोत्तम दूध आहे' ही कायदेशीर सूचना अनेक ठिकाणी छापलेलीच नव्हती, असे राज्यभरात एफडीएने केलेल्या तपासणीत आढळले. तसेच, राज्यातील स्तनपानाची आकडेवारी चिंताजनक रीतीने खाली येत आहे.

६ महिन्यांपेक्षा लहान मुलांना केवळ आईचे दूध देण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवरून घसरून ५८ टक्क्यांवर आले आहे. शहरी भागात केवळ ५२ टक्के माता स्तनपान करतात, तर ग्रामीण भागात हे प्रमाण ७५ टक्के आहे. बाळ जन्मल्यानंतर पहिल्या एका तासात त्याला आईचे दूध मिळणे अत्यंत गरजेचे असते. परंतु, महाराष्ट्रात दुर्दैवाने ५० टक्के माता जन्मल्यानंतर पहिल्या तासात बाळाला दूध पाजत नाहीत, असे मुंढे म्हणाले.

तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, या चुकीच्या आहारपद्धतीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. सध्या १० ते १२ वर्षे वयोगटातील ३५ टक्के मुलांमध्ये उच्च रक्तदाब आणि १० ते १९ वयोगटात १२ टक्के मुलांमध्ये मधुमेह  दिसून येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.