🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नयनरम्य खगोलीय घटना! सांगलीत अनुभवायला मिळाले दुर्मिळ 'शुक्र-चंद्र पिधान'; एकता वैभव घोडके-गोंधळे यांनी टिपले टिपले क्षणचित्रे.

नयनरम्य खगोलीय घटना! सांगलीत अनुभवायला मिळाले दुर्मिळ 'शुक्र-चंद्र पिधान'; एकता वैभव घोडके-गोंधळे यांनी टिपले टिपले क्षणचित्रे.


सांगली :- खगोलप्रेमींसाठी सोमवारची सायंकाळ एका दुर्मिळ खगोलीय घटनेची साक्ष देणारी ठरली. शुक्र-चंद्र पिधानाची घटना शहरवासीयांना अनुभवता आली. भारतात विशेषतः दक्षिण आणि मध्य भारतातून ही घटना दिसण्याची शक्यता होती.

या विलोभनीय घटनेचे छायाचित्र सांगलीच्या एकता वैभव घोडके (गोंधळे )यांनी टिपले आहे. सोमवारी सायंकाळी सुमारे ५.२२ वाजता शुक्र ग्रह चंद्राच्या उत्तर शृंग भागामागे जाऊन अदृश्य झाला. चंद्रकोरीने शुक्राला आपल्या मागे झाकल्याने काही काळ शुक्र दिसेनासा झाला. सुमारे एका तासानंतर, ६ वाजून १८ मिनिटांच्या सुमारास चंद्राच्या खालच्या बाजूने शुक्र पुन्हा बाहेर आला. या संपूर्ण प्रक्रियेला खगोलशास्त्रात ‘पिधान’ असे म्हटले जाते. शुक्र हा आकाशातील सर्वाधिक तेजस्वी ग्रह असल्याने त्याचे चंद्रामागे लपणे आणि पुन्हा बाहेर येणे ही खगोलप्रेमींसाठी विशेष आकर्षणाची घटना असते.
सूर्यास्तामुळे प्रत्यक्ष पिधान पाहण्याची संधी हुकली शुक्र चंद्रामागे जाण्याचा ‘स्पर्श’ आणि पुन्हा बाहेर येण्याचा ‘मोक्ष’ या दोन्ही वेळच्या कालावधीत सूर्य आकाशात असल्याने ही घटना उघड्या डोळ्यांनी पाहणे शक्य झाले नाही. त्यातच आकाश ढगाळ असल्याने खगोलप्रेमींना पिधानाचे प्रत्यक्ष दर्शन घेता आले नाही. मात्र सूर्यास्तानंतर परिस्थिती काहीशी अनुकूल झाली. पश्चिम-दक्षिण दिशेच्या आकाशात चंद्र आणि शुक्र एकमेकांच्या अत्यंत जवळ आलेले विलोभनीय दृश्य पाहायला मिळाले. चंद्रकोरीच्या जवळ तेजस्वी शुक्र चमकत असल्याने हे दृश्य लक्षवेधी ठरले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.