🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...


गणेशोत्सवासह पारंपरिक सण-उत्सव, कार्यक्रमात डीजे, ढोल वादन या विरोधात भूमिका घेतलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर आज पुण्यात हल्ला करण्यात आला. संतोष चव्हाण नावाच्या तरुणानं हा गणेशोत्सवाला विरोध करतो म्हणत विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला.

पुण्यात टिळक रोडवरील कशाळे चौकात ही घटना घडली. या प्रकरणी संतोष चव्हाणविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आलीय. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत दादांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या संतोष पंडित यांना अटक झालीय. या दोन्हीबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे वाद योग्य वाटत नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विद्यानंद बापट हे पुण्यात माध्यमांशी संवाद साधत असताना अचानक तिथे आलेल्या गणेश मंडळाचा कार्यकर्ता संतोष चव्हाण यानं कानशिलात मारली. त्यावेळी तिथं असलेल्यांनी संतोष चव्हाणला बाजूला ढकलल्यानं पुढील अनर्थ टळला. मात्र या प्रकरणी संतोष चव्हाणविरोधात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही हल्ला निंदनीय असल्याचं म्हटलंय.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा पद्धतीनं मारहाण करणं योग्य नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडत असताना हल्ला करणं योग्य नाही. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. पुण्यासारख्या ठिकाणी असे वाद योग्य वाटत नाहीत. आपला गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीकडे नेला पाहिजे. त्यासाठी आवश्यक गोष्टी केल्या पाहिजेत. संतोष पंडित यांच्या अटकेवर मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केलं नाही.

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला निंदनीय आहे. गणेशोत्सव काळात अशी घटना योग्य नाही. गणेश मंडळांना सांगू इच्छितो की संयम ठेवा. त्यांच्यासोबत जाऊन हिंसा करणे अयोग्य, वक्तव्य करताना नियम पाळले नाही तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
संतोष चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संबंधित हल्ला करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. विद्यानंद बापट यांना पोलिस सुरक्षा देण्यात येणार आहे. तसंच बापट यांच्या विरोधातही अर्ज पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलीय.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.