महावीर स्टेट ॲकॅडमी, कसबे डिग्रज येथील शिक्षक _श्री. जयकुमार चव्हाण सर_ यांना कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्सच्या वतीने दिला जाणारा मानाचा _'आदर्श शिक्षक पुरस्कार'_ प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
_श्री. चव्हाण सर यांना २२ वर्षांचा अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असून, ते वेळेचे काटेकोर पालन करणारे, अत्यंत विनम्र आणि समर्पित शिक्षक म्हणून ओळखले जातात. प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक काळजी घेणे आणि ज्या विद्यार्थ्यांना अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणे हे त्यांच्या अध्यापनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या या समर्पित कार्यामुळेच दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांच्या विषयाचा १००% निकाल लागत असून, इंग्रजी विषयात सर्वाधिक गुण मिळत आहेत._
हा पुरस्कार कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स मीटमध्ये उपजिल्हाधिकारी _मा. डॉ. स्नेहल कनिचे मॅडम_ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष _मा. श्री. रावसाहेब पाटील_ यांच्या हस्ते श्री. चव्हाण सरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे फाऊंडर _श्री. डी. डी. चौगुले सर_, अध्यक्ष _श्री. रावसाहेब पाटील_, उपाध्यक्ष _श्री. पोपटराव डोरले_, सेक्रेटरी _श्री. अजितप्रसाद पाटील_, संस्थेचे विश्वस्त _श्री. प्रशांत अवधूत, श्री. सुदर्शन शिरोटे, डॉ. बाळासाहेब चोपडे, श्री. महावीर चौगुले, श्री. नितीनकुमार चौगुले, श्री. मिलिंद भिलवडे_ तसेच एस.के.एस.पी. कॉलेजचे प्राचार्य _श्री. किरण वाडकर सर_ व महावीर स्टेट ॲकॅडमीच्या प्रिन्सिपॉल _सौ. जयश्री पाटील_ आदी मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.