🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

परंपरा मोडली! यंदा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये रंगणार 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा

परंपरा मोडली! यंदा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये रंगणार 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळा

७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा यंदा दिल्लीबाहेर होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. गुजरातमधीलकेवडिया येथे २२ सप्टेंबर रोजी हा सोहळा पार पडणार आहे. केवडियाचे नामकरण आता 'एकता नगर' असे करण्यात आले आहे. येथे जगातील सर्वात उंच पुतळा असलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा ५९७ फूट उंच असून, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.

१९५४ मध्ये झालेल्या पहिल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यापासून दिल्लीतील विज्ञान भवन हे या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचं प्रमुख ठिकाण राहिलं आहे. गेल्या अनेक दशकांपासून बहुतांश सोहळे याच ठिकाणी पार पडले आहेत. मात्र, यंदा ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी दिल्लीऐवजी गुजरातमधील एकता नगरची निवड करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीबाहेर होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९७१ मध्ये १७वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा चेन्नई येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरस्कार सोहळ्याचं आयोजन दिल्लीबाहेर करण्यात येत आहे.

जाणून घ्या कुणाला कोणता पुरस्कार

जुलैमध्ये जाहीर झालेल्या ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'आर्टिकल ३७०'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर मल्याळम सुपरस्टार ममूटी  आणि बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन यांना अनुक्रमे 'ब्रह्मयुगम' आणि 'चंदू चॅम्पियन'  या चित्रपटांतील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे.



अभिनेता-दिग्दर्शक रणदीप हुड्डाला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' दिला जाणार आहे. तेलुगू विज्ञान-कथा चित्रपट 'कल्कि २८९८ एडी'ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनात्मक चित्रपटाचा पुरस्कार मिळणार आहे. तर अरुण माथेश्वरन दिग्दर्शित आणि धनुष अभिनीत तमिळ चित्रपट 'कॅप्टन मिलर'ला ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.