🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भिक्षा देण्यास महिलेचा नकार, भिकाऱ्याने पीडितेचं नाक चावून केली इजा

भिक्षा देण्यास महिलेचा नकार, भिकाऱ्याने पीडितेचं नाक चावून केली इजा


एका भिकाऱ्याने महिलेला भीक मागितली असता, महिलेनं पैसे देण्यास नकार दिला. भिकाऱ्याला राग सहन न झाल्याने भिकाऱ्याने महिलेच्या नाकावर जोरदार चावा घेतला होता. संबंधित महिला ही गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातल होती. जेव्हा महिलेनं भिक्षा देण्यास नकार दिला असता, पीडितेला एका झाडीत ढकलले होते. त्याने आपल्या दातांनी महिलेच्या नाकाला जोराचा चावा घेतला होता. ही घटना लखनऊच्या मथुरा येथील आहे.

भिकाऱ्याला भीक्षा देण्यास महिलेचा नकार

ज्या महिलेला भिकारी चावला तिची मोनिका रैना अशी ओळख समोर आली आहे. मोनिका रैना या मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. महिला ही सहा महिन्यांपासून गोवर्धन परिक्रमा करत आहेत. त्या राधाकुंडजवळ राहतात. सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास, महिलेजवळ आला आणि भिक्षा मागू लागला होता. जेव्हा मोनिकाला भीक देण्यास नकार दिला असता, तेव्हा तो त्यांच्या मागे जाऊ लागला.

भिकाऱ्याने महिलेच्या नकाचा घेतला चावा
जेव्हा मोनिका त्याला पुन्हा भिक्षा देण्यास नकार दिला असता, तो तिला शिवीगाळ करू लागला होता. नंतर त्याने पीडितेला खाली ढकलून दिले होते आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने पीडित महिलेच्या नाकावर जोराचा चावा घेतला होता, ज्यात महिलेच्या नाकावर मोठी इजा झाली होती. या घटनेनं परिक्रमा मार्गावर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेनं महिला घाबरून गेली होती. 

दरम्यान, एसएसपी श्लोक कुमार यांच्या माहितीनुसार, हल्ल्यात महिलेच्या नाकाला खोल जखम झाली होती. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी घटनेची माहिती देत सांगितलं की, आरोपी हा मानसिकदृष्ट्या आजारी आहे, नंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.