🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात...": मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा, मंत्र्यांनाही भरसभेत झापले!

​"शहाणा हो, नाहीतर एका फटक्यात...": मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा, मंत्र्यांनाही भरसभेत झापले!


मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचं स्पष्ट दिसत आहे. एकनाथ शिंदेंचा एकेरी उल्लेख करू नये, या मंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच अत्यंत जहाल शब्दांत हल्लाबोल केला आहे. 

एकनाथ शिंदेंना म्हणावं, “ही नाटकं खेळू नका, मराठे मराठ्यांच्या अंगावर सोडायचे. मगतर लवकर संपशील लय. शहाणा हो लवकर, नाहीतर एका फटक्यात संपशील,” असा थेट आणि निर्वाणीचा इशारा जरांगे यांनी दिल्याने राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का?

बुधवारी अंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची बाजू घेणारे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनाही त्यांनी शेलक्या शब्दांत सुनावलं. “तुम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक झालात म्हणून स्वतःच्या जातीला विसरणार का? एकनाथ शिंदे तुमचा बाप आहे का?” असा संतप्त सवाल करत माझी भाषा इथून पुढे अधिकच तिखट होईल, असं जरांगे यांनी ठणकावून सांगितलं.

‘मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावून दंगल घडवण्याचा कट’

दुसरीकडे, जरांगे यांनी उदय सामंत आणि आमदार संजय शिरसाट यांच्यावर एक गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. सामंत आणि शिरसाट यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडवण्याविषयी फोनवर बोलणं झाल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. ‘एकाने हाणल्यासारखं आणि दुसऱ्याने मारल्यासारखं करायचं’, अशी या नेत्यांची योजना असून, मराठ्यांमध्ये मारामाऱ्या लावून दंगल घडवण्याचा सरकारचा डाव असल्याचं ते म्हणाले. 

प्रत्येक मंत्री आणि आमदाराकडे ५०० गुंड पोसलेले असल्याचा दावा करत, जरांगे यांनी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. “तुमच्या गुंडांची एक जरी गोळी आमच्या मराठ्याच्या पोराला लागली, तर ही पोरं तुमचं नरडं फोडतील. आम्ही तुमचे गुंड दगडाखाली ठेचून काढू,” असा संतप्त इशारा त्यांनी दिला. उदय सामंत तुम्ही मला दादा म्हणू नका. तुझ्यावाचून काही अडत नाही. सामंत यांनी या प्रकरणी स्वतःच्या मुलाची शपथ घेऊन दाखवावी, असं खुलं आव्हानही जरांगे यांनी दिलं आहे.

मराठ्यांना दिलेली प्रमाणपत्रं रद्द करण्यामागेही शिंदे आणि संजय शिरसाट यांचाच हात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तुम्हाला तुमच्या शिंदेंची माया येते, मग आम्हाला आमच्या समाजाची माया येणार नाही का, असा सवाल करत जरांगे यांनी आता आरपारच्या लढाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.