🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"संघर्ष योद्धा नाही, मनोज जरांगे तर 'टेंडर योद्धा'!"; अजय बारस्करांचा जरांगेंसह सरकारवर धगधगता हल्ला, गंभीर प्रश्नांनी खळबळ

"संघर्ष योद्धा नाही, मनोज जरांगे तर 'टेंडर योद्धा'!"; अजय बारस्करांचा जरांगेंसह सरकारवर धगधगता हल्ला, गंभीर प्रश्नांनी खळबळ


मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. आता त्यांच्यावर टीका सुरू आहेत. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि मराठा समन्वयक अजय बारस्कर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत.

"२० दिवसांनंतर अखेर हे उपोषण नाट्य संपले असून यात मराठा समाज जिंकला नाही, तर केवळ जरांगेंचा वैयक्तिक अहंकार जिंकला आहे. जरांगे हे कुटील आणि कपटी असून या सरकारचा त्यांना मोठे करण्यात मोठा हात आहे," असा आरोप बारस्कर यांनी केला. मनोज जरांगे यांचा मुंबई दौरा रद्द होण्यामागे मोठी 'बंद खोलीतील सेटिंग' असल्याचा दावा बारस्कर यांनी केला. ते म्हणाले, "अंतरवली सराटीच्या सरपंचांचा मुलगा आणि कंत्राटदारांनी मिळून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत ही सेटिंग केली आहे. वाळू माफिया आणि ईडीची सुरू असलेली चौकशी थांबवण्यासाठी या लाभार्थी टोळीने हा समझोता केला. आता यापुढे कोणतीही ईडी चौकशी होणार नाही. विखे पाटलांनी सांगावे की, १४०० कोटींचे टेंडर बलांडे यांना दिले का? जरांगेंची पहिली स्क्रिप्ट बारामतीहून आली होती, त्यानंतर एकनाथ शिंदेंची स्क्रिप्ट होती. आता शिंदेंना शिव्या घालून विखे पाटलांवर प्रेम दाखवले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमागे विखे पाटीलच सूत्रधार असावेत, असेही बारस्कर म्हणाले.

'मराठा-ओबीसी समाजात तेढ; स्वतःच्या लेकराबाळांसाठीच लढा'

बारस्कर म्हणाले, "जरांगेंचे हे संपूर्ण आंदोलन मराठा समाजासाठी नसून स्वतःच्या लेकराबाळांना आणि सोबतच्या लोकांना राजकारणात आणण्यासाठी सुरू आहे. मुख्य प्रश्नावरून लक्ष हटवून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व बुद्धीहीन माणसाकडे असावे, असा हा प्रकार सुरू आहे. जरांगे म्हणजे ब्रह्मराक्षस बनून आपल्या डोक्यावर बसले आहेत. सरकारने काहीही ठोस आश्वासन दिलेले नसताना जरांगे समाजाला वेड्यात काढत आहेत. डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा ड्रामा करण्यासाठी ते आणखी एक इशारा देतील."

'गॅलेक्सी हॉस्पिटलचा १२ वा अंक
"गॅलेक्सी हॉस्पिटलमधील हा त्यांचा बारावा अंक सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये सहसा मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध होते. पण इथे छाताडावर माईक घेऊन रोज नाटके केली जातात. 'माहेरची साडी' सिनेमासारखा हा भावनिक खेळ सुरू असून, जरांगे इतका अभिनय करतात की मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांचेही काम बंद पडेल. जरांगेंच्या या अभिनयासाठी त्यांना थेट 'ऑस्कर' पुरस्कारच दिला पाहिजे. कालपर्यंत कोलमडलेल्या जरांगेंमध्ये आज अचानक कुठून तरतरी आली? विखेंनी त्यांना नेमके काय पाजले?" असा खोचक सवालही त्यांनी केला.
'मराठा समाजाने भावनिक होऊ नये'

"मी संत तुकोबारायांच्या विचारांचा वारसदार आहे. जरांगे फक्त गर्दी दाखवून आपली दुकानदारी चालवत आहेत. सरकारने आणि जरांगेंनी एकमेकांशी साटेलोटे केले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण आणि नागरिकांनी अशा नाट्यावर भावनिक होऊ नये. समाजातील सुशिक्षित अभ्यासक आणि विचारवंतांनी आता पुढे येऊन या प्रकारावर बोलण्याची गरज आहे," असे आवाहनही अजय बारस्कर यांनी केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.