🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तुळस नीट वाढतच नाही? १ चमचा 'हा' पांढरा पदार्थ कुंडीत घाला, डेरेदार-हिरवीगार होईल तुळस

तुळस नीट वाढतच नाही? १ चमचा 'हा' पांढरा पदार्थ कुंडीत घाला, डेरेदार-हिरवीगार होईल तुळस


तुळशीचं रोप जवळपास प्रत्येक घरात असतं. तुळशीचं रोप धार्मिकदृष्ट्या तसंच आरोग्याच्यादृष्टीनंही महत्वाचं असतं. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. तुळशीचं रोप कोमेजू नये वर्षभर चांगलं राहावं यासाठी काही टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरतील.

तुळशीला दिवसातून किमान ४ ते ६ तास थेट Sunlight मिळणे गरजेचे असते, त्यामुळे रोप नेहमी बाल्कनीत किंवा खिडकीजवळ उन्हाच्या ठिकाणी ठेवावे. 

प्रसिद्ध गार्डनिंग एक्सपर्ट तरूण चोप्रा यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी दिल्यास त्याची मुळे कुजतात, म्हणून Overwatering टाळून कुंडीतील माती सुकल्यावरच हलके पाणी द्यावे. तसेच, कुंडीमध्ये Proper Drainage System असावा जेणेकरून अतिरिक्त पाणी सहज बाहेर निघून जाईल. 

तुळशीचे रोप घनदाट  बनवण्यासाठी वेळोवेळी वरच्या बाजूची मंजिरी आणि लहान पाने कट करून वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. तुळशीच्या मंजिरी वेळोवेळी तोडत राहा. तुळस घनदाट ठेवण्यासाठी मंजिरी वेळोवेळी तोडत राहायला हव्यात. एक्सपर्ट्स सांगतात की मंजिरी सतत वाढत राहिल्या तर फुलांची वाढ कमी होते. म्हणून मंजिरी जास्त दिसल्यास तोडत राहा. हलक्या हातानं ट्रिम करा. ज्यामुळे नवीन फांद्या येतील. तुळशीच्या रोपाला मध्यभागातून  वेळोवेळी सैल करत राहा. ठराविक वेळेनंतर माती सावधगिरीनं खोदा रोपाच्या मुळांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.

तुळशीसाठी घरगुती खत कोणते?

तुळशीच्या रोपाची झपाट्याने वाढ होण्यासाठी आणि पाने हिरवीगार राहण्यासाठी घरातीलच एक उत्तम  म्हणजे चाल्क पावडर यामध्ये मुबलक प्रमाणात कॅलसिम अँड मिनिराल्स असतात, जे तुळशीच्या मुळांना बळकट करतात आणि रोपाचा विकास वेगाने घडवून आणतात. घरात असलेला पांढरा खडू बारीक वाटून त्याची पावडर महिन्यातून एकदा १ चमचा मातीत मिसळावी किंवा (ताकाचे किंवा दह्याचे उरलेले पांढरे पाणी) पाण्यात पातळ करून कुंडीत टाकावे. हे पांढरे घरगुती खत मातीचा pH बॅलन्स ठेवून Natural Soil Booster म्हणून काम करते, ज्यामुळे तुळशीचे रोप वर्षभर हिरवेगार आणि टवटवीत राहते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.