बऱ्याचदा व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवर कोणीतरी मेसेज पाठवतो आणि आपण तो वाचण्यापूर्वीच 'Delete for Everyone' करून टाकतो. अशा वेळी समोरच्या व्यक्तीने नेमके काय लिहिले असेल, याबद्दलची उत्सुकता खूप वाढते. डिलिट झालेला मेसेज परत मिळवण्यासाठी व्हॉट्सअपमध्ये थेट कोणताही पर्याय नसला, तरी अँड्रॉईड स्मार्टफोनमधील एका खास फीचरमुळे तुमचे हे काम अगदी सोपे होऊ शकते. जाणून घेऊया या भन्नाट ट्रिकबद्दल आणि त्यासाठी कोणत्या सेटिंग्स कराव्या लागतील.
काय आहे नोटिफिकेशन हिस्ट्री फीचर?
अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये 'नोटिफिकेशन हिस्ट्री' नावाचा एक इन-बिल्ट पर्याय उपलब्ध असतो. हे फीचर फोनवर येणाऱ्या सर्व अॅप्सच्या नोटिफिकेशन्सचा एक अचूक रेकॉर्ड सेव्ह करून ठेवते. मेसेज आल्यानंतर जर कोणी तो चॅटमधून काढून टाकला, तरीही त्या मेसेजचे नोटिफिकेशन फोनच्या हिस्ट्रीमध्ये सेव्ह राहिल्यामुळे अनेकदा डिलिट झालेला मजकूर वाचायला मिळतो.
अँड्रॉईड फोनमध्ये हे फीचर कसे सुरू कराल?
हा पर्याय वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये तो आधीपासूनच ऑन असणे गरजेचे आहे. ब्रँडनुसार ही सेटिंग थोडीफार बदलू शकते. सॅमसंग (Samsung) युजर्ससाठी फोनच्या Settings मध्ये जा, त्यानंतर Notifications वर टॅप करा. पुढे Advanced Settings मध्ये जाऊन Notification history निवडा आणि समोरील टॉगल On करा.
इतर अँड्रॉईड फोन युजर्ससाठी
फोनची Settings उघडून Notifications मध्ये जा. तिथे Notification history वर क्लिक करून Use notification history हा पर्याय ऑन करा.जर तुम्हाला सेटिंग शोधण्यात अडचण येत असेल, तर थेट सेटिंग्जच्या सर्च बॉक्समध्ये Notification history टाईप करून हे फीचर सहज शोधू शकता.
डिलिट झालेला मेसेज कसा पाहाल?
हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर फोनवर येणाऱ्या प्रत्येक नोटिफिकेशनची नोंद ठेवण्यास सुरुवात होते. समजा, कोणी मेसेज पाठवून तो डिलिट केला, तर तुम्हाला Settings > Notifications > Notification History वर जाऊन संबंधित मेसेजिंग अॅपचे नाव शोधावे लागेल. जर मेसेज येताना फोनवर नोटिफिकेशन जनरेट झाले असेल, तर त्याचा काही भाग किंवा संपूर्ण मेसेज तुम्हाला येथे वाचायला मिळू शकतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
अगोदरपासून ऑन असावे - मेसेज आल्यावर जर हे फीचर आधीपासून सुरू नसेल, तर डिलिट झालेला मेसेज तुम्हाला अजिबात पाहता येणार नाही.24 तासांची मर्यादा - अँड्रॉईड सामान्यतः केवळ गेल्या 24 तासांमधील नोटिफिकेशन्सचा डेटा सुरक्षित ठेवतो. त्यामुळे खूप जुने मेसेज याद्वारे शोधणे शक्य नसते.म्युट चॅटवर लागू नाही - जर तुम्ही एखादी व्हॉट्सॲप चॅट म्यूट केली असेल आणि त्यावर येणाऱ्या मेसेजचे नोटिफिकेशन पॉप-अप झाले नाही, तर त्याची नोंद नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये होत नाही.मोठ्या मेसेजसाठी अडचण - मेसेज खूप मोठा असेल, तर नोटिफिकेशन विंडोमध्ये दिसणारा मोजकाच मजकूर सेव्ह होतो, ज्यामुळे संपूर्ण माहिती मिळण्याची गॅरंटी नसते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.