हॉटेलच्या जेवणाला महागाईचा 'तडका', ताटात 'दरवाढीचं जेवण, 20 टक्के दर वाढवण्याचा निर्णय
मुंबई : अनेकदा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी जातो किंवा हॉटेलमधून ऑनलाईन पदार्थ मागवतो मात्र आता हॉटेलचं जेवण प्रचंड महागणार आहे. जेवणच नाही, तर नाष्ट्याच्या पदार्थांचीही मोठी दरवाढ होणा हॉटेलचालकांनी दरवाढीचा निर्णय का घेतलाय?
आणि हॉटेलचं जेवण नेमकं किती महागणार आहेत कारण, जेवढ्या बजेटमध्ये तुम्ही आधी हॉटेलात जेवायचा ते बजेट आता पुरणार नाही . हॉटेलचं जेवण आता 10 ते 15 टक्क्यांनी महागणारेय. फक्त जेवणाचे पदार्थच नाही तर, नाष्ट्याचे पदार्थही चांगलेच महागणार आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये रेस्टॉरंट चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किमतीत वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅसच्या दरातील वाढ, अन्नपदार्थ, भाज्या, किराणा माल, वाहतूक, दुकानांचे भाडे आणि कर्मचाऱ्यांचे पगार वाढल्याने हॉटेल व्यावसायिक हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मेन्यूच्या दरात वाढ करण्याचा पर्याय विचारात घेतला जात आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोट भरलं तरी खिसा मात्र रिकामा होणार
हॉटेलमध्ये जाऊन जेवण केल्यावरच नाही तर तुम्ही ऑनलाईन जेवण मागवलं तरीही तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. गॅस, भाज्या, धान्य तसेच वाहतूक खर्च वाढल्याने हॉटेलचालकांनी आता दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण अनेकदा थोडा चेंज म्हणून हॉटेलचं जेवण करतो. तर काहीजण रोजच हॉटेलमध्ये जेवण करतात. पण आता हॉटेलात जाऊन जेवण करा किंवा हॉटेलचं जेवण ऑनलाईन मागवून घरी खा... जिभेला चमचमीत लागलं आणि पोट भरलं तरी खिसा मात्र रिकामा होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.