🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"प्रशासकीय वर्तुळात खळबळ! पुण्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड; 6 बडे अधिकारी तडकाफडकी निलंबित!"

​"प्रशासकीय वर्तुळात खळबळ! पुण्यात कोट्यवधींचा घोटाळा उघड; 6 बडे अधिकारी तडकाफडकी निलंबित!"


महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागात खळबळ उडवून देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. उद्योगांशी संबंधित परवाने देताना कथित आर्थिक देवाणघेवाण केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) पुणे प्रादेशिक कार्यालयातील तब्बल सहा वरिष्ठ आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय कारवाईमुळे प्रदूषण नियंत्रण मंडळात आणि शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांची नावे

मच्छिमार व उद्योगांना परवाने देताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका असलेल्या निलंबित अधिकाऱ्यांमध्ये बाबाबसाहेब कुकडे (प्रादेशिक अधिकारी), नवनाथ अवताडे (उपप्रादेशिक अधिकारी), कार्तिकेय लंगोटे (उपप्रादेशिक अधिकारी), सुषमा कुंभार (क्षेत्रीय अधिकारी), जयंत डोके (क्षेत्रीय अधिकारी) आणि अजय खामकर (क्षेत्रीय अधिकारी) यांचा समावेश आहे. एकाच विभागातील सहा बड्या अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.

थेट व्हिडिओ पुराव्याआधारे कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, उद्योगांना कायदेशीर परवानग्या देण्याच्या मोबदल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या तक्रारींसोबत थेट व्हिडिओ पुरावे देखील सादर करण्यात आले होते. या भक्कम पुराव्यांच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना आधी 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर खुलासे मागवण्यात आले होते. 

मात्र, संशयित अधिकाऱ्यांनी दिलेले खुलासे समाधानकारक नसल्याचं सांगत सक्षम प्राधिकाऱ्यांनी ते फेटाळून लावले आणि अखेर या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे कठोर आदेश जारी केले आहेत. या प्रकरणामुळे शासकीय कार्यालयांमध्ये चालणाऱ्या आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.