🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात भाजपचे 'सरप्राइज कार्ड'! डॉ. स्मिता योगेश जाधव यांना थेट उमेदवारी; जाणून घ्या त्यांचा परिचय

पुण्यात भाजपचे 'सरप्राइज कार्ड'! डॉ. स्मिता योगेश जाधव यांना थेट उमेदवारी; जाणून घ्या त्यांचा परिचय


महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पाठोपाठ भारतीय जनता पक्षानेही आपल्या तीन उमेदवारांची यादी जाहीर केली असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये.

महायुतीमध्ये चर्चा सुरू असताना भाजपने अचानक पुण्याच्या जागेसाठी संभाव्य नाही तर धक्कातंत्राचा वापर करत वेगळ्याच उमेदवराचं नाव जाहीर केलं. पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशातच आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.

कोण आहेत डॉ. स्मिता योगेश जाधव?

डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी पुण्यात शिक्षण, माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. डॉ. स्मिता यांनी बीई कॉम्प्युटर्स, एमबीए फायनान्शियल मॅनेजमेंट आणि एज्युकेशनमध्ये पीएच.डी. अशी उच्च विद्याविभूषित शैक्षणिक पार्श्वभूमी प्राप्त केली आहे. नवकल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी शिक्षण क्षेत्रात आधुनिक बदल घडवून आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव
डॉ. स्मिता या पिंपरी येथील नामांकित डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. यासोबतच त्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. शैक्षणिक प्रशासनात त्यांचं कार्य उल्लेखनिय आहे. आता त्यांना भाजपकडून लॉटरी लागली असून यामुळे महायुतीत पेचप्रसंग देखील वाढण्याची शक्यता आहे.
कस्तुरी क्लब अध्यक्षा

डॉ. स्मिता पुढारी पब्लिकेशनच्या संचालक असून टोमॅटो 94.3 एफएम आणि आपलं एफएम 91.9 च्या कार्यकारी संचालक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत त्यांनी व्यवसायाला एक नवी दिशा दिली आहे. महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यात त्यांनी कस्तुरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी काम केलं आहे.

अवॉर्डची यादी
कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा या नात्याने त्यांनी 18 हजारांपेक्षा जास्त महिलांचे मजबूत नेटवर्क उभारलं अन् महिलांना स्वावलंबी बनवलं. वेणुताई चव्हाण युवती पुरस्कार, भारत सन्मान निधी पुरस्कार, ग्लोबल वुमेन इन्स्पिरेशन अवॉर्ड, एज्युप्रन्योर ऑफ द इयर, बेस्ट सीईओ, आऊटस्टँडिंग लीडरशिप इन हायर एज्युकेशन, प्राईड ऑफ इंडिया अवॉर्ड आदी पुरस्कारांनी सन्मान देखील त्यांची झाला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.