🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वेळेवर उपचारांअभावी वसई-विरारमध्ये ५१ वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू; तीन रुग्णालयांत भटकंती ठरली प्राणघातक

वेळेवर उपचारांअभावी वसई-विरारमध्ये ५१ वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू; तीन रुग्णालयांत भटकंती ठरली प्राणघातक


वसई-विरारमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विरारच्या आगाशी परिसरातील एका घरात ५१ वर्षीय महिलेला विषारी सर्पाने दंश केला. उपचारादरम्यान दुर्दैवाने या महिलेचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शैला ऊर्फ चार्लेट गोन्साल्विस असे मृत महिलेचे नाव आहे. शैला गोन्साल्विस या पती आणि दोन मुलींसोबत विरार पश्चिम येथील आगाशी भागात राहत होत्या. त्या अंधेरीतील सीबर्ड मेडिकल सेंटरमध्ये काम करत होत्या. मंगळवारी त्या घरातील किचनमध्ये काम करत असताना अचानक एका विषारी सापने त्यांना दंश केला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ प्राथमिक उपचार दिले आणि तातडीने आगाशी इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

उपचारादरम्यान प्रकृती खालावली आणि...
खाजगी रुग्णालयातील उपचारानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी वसई-विरार महानगरपालिकेच्या बोळिंज इथल्या रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात आणल्यावर त्यांना तातडीची ट्रीटमेंट देत इंजक्शन देण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती खालावत चालल्याने त्यांना पुढील उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शैला यांचा मृत्यू झाला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.