🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तानातील ४० हजार पोलिसांचं सरकारविरोधात बंड? रावलपिंडी रिपोर्टमधून जळजळीत वास्तव आलं समोर

पाकिस्तानातील ४० हजार पोलिसांचं सरकारविरोधात बंड? रावलपिंडी रिपोर्टमधून जळजळीत वास्तव आलं समोर


पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या सांगण्यावरून इम्रान खान यांचे एकमेव प्रांतीय सरकार निलंबित करण्यात आलं आहे. सरकारचे प्रमुख सोहेल आफ्रिदी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आहे. 

जेव्हा सोहेल आफ्रिदी इम्रान खान यांना अदियाला तुरुंगातून सोडवण्यासाठी पाकिस्तानभर मोर्चा काढण्याच्या तयारीत होते तेव्हा हा निर्णय आला आहे. या घटनेकडे मुनीर आणि इम्रान यांच्यातील एक नवीन राजकीय लढाई म्हणून पाहिले जात आहे.

यातच रावलपिंडीतून एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्याने सरकार आणि सैन्याचे टेन्शन वाढवले आहे. डॉन वृत्तपत्रानुसार, सैन्य आणि सरकार पंजाबच्या ४० हजार पोलीस कर्मचाऱ्यांना खैबर पख्तूनख्वाह प्रांतात तैनात करण्याची तयारी करत आहे. हा प्रांत इम्रान खान यांचा गड मानला जातो. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी याचा विरोध केला आहे. पाकिस्तानने अलीकडेच काही पोलीस कर्मचाऱ्यांना इम्रान खान यांच्या कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केले होते. 

मात्र त्यांना कुठलीही सुविधा दिली नाही. तिथे शिळे अन्न खाण्यास त्यांना मजबूर व्हावे लागले. ज्यामुळे ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अशावेळी पंजाबपासून दूर खैबर प्रांतात पाठवण्याला पोलिसांनी विरोध केला आहे. हा टास्क पूर्ण करण्यास पंजाबच्या पोलिसांनी नकार दिला आहे. आम्ही मुख्यालयाचे आदेश मानणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. आम्ही अशा सरकारसाठी लढणार नाही जे आमच्याबाबत काही विचार करत नाही असं पोलीस कर्मचारी सांगतात. मात्र अद्याप असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचं पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे.

खैबरमध्ये पंजाब पोलिसांनी तैनाती का?

दरम्यान, २०२४ मध्ये जेव्हा पाकिस्तानात निवडणूक झाली तेव्हा खैबर एकमेव प्रांत होता, जिथे शहबाज आणि मुनीर यांना जनतेचा कौल मिळाला नाही. या प्रांतात इम्रान खान यांच्या पक्षाचं सरकार बनले. मात्र इथलं सरकार दहशतवाद्यांशी जोडलेले आहे असा आरोप शहबाज शरीफ यांच्या पक्षातील नेत्यांचा आहे. इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही शहबाज आणि मुनीर यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळेच खैबरमध्ये जिथे शहबाज शरीफ यांची भाची मरियम नवाज सत्तेवर आहेत, त्या पंजाबमधील पोलीस तैनात करण्याची चर्चा सुरू आहे. मात्र ज्याप्रकारे पोलिसांनी बंडाचा आवाज उचलला आहे त्याने सरकारचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.