🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत पदवीधर निवडणुकीचा तिढा अन् मित्रपक्षांचा निरुत्साह; उमेदवारी वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘डॅमेज कंट्रोल’ दौरा!

सांगलीत पदवीधर निवडणुकीचा तिढा अन् मित्रपक्षांचा निरुत्साह; उमेदवारी वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘डॅमेज कंट्रोल’ दौरा!


सांगली : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची बंडखोरी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचारातील निरूत्साह या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज सांगली दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला असून प्रदेश सचिव शरद लाड यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री भेट देउन नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

पदवीधर निवडणुकीसाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि शिक्षक गटातील कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराची धुरा पदवीधर मधून उमेदवारीसाठी आग्रही असलेले शरद लाड यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. याचा वेळोवेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आढावा घेत आहेत. मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटना वगळता अन्य मित्र पक्ष महायुतीच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. 





शिवसेनेने शिक्षक गटातून सचिन सानप यांच्या उमेदवारीला पाठबळ दिले असून सानप यांच्या प्रचारासाठी मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मेळावाही पार पडला. यामुळे महायुतीमध्ये निवडणुकीत दुफळी पडल्याचे दिसून आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कार्यकर्तेही या निवडणूक प्रचारापासून अलिप्तच आहेत.

या पार्श्‍वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सांगली दौरा आयोजित करण्यात आला आहे. महायुतीअंतर्गत सुरू असलेल्या सुप्त संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस सोमवारी सकाळी सांगलीत येणार असून ते प्रदेश सचिव शरद लाड यांच्या निवासस्थानी निवडक कार्यकर्त्यांशी संवाद साधून निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहेत. तसेच प्रचारात महायुतीचे पदाधिकार्‍यांना सहभागी करून घेण्याबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. यानंतर पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार स्मिता जाधव आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ कार्यकर्ते, पदवीधर व शिक्षक मतदारांचा मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उमेदवारांसह महायुतीचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.