🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"...तिथं तिचा घात झाला का?" मुग्धाच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या शब्दांनी खळबळ; मोलकरणीसमोरचा तो गौप्यस्फोट ठरला अखेरचा!

"...तिथं तिचा घात झाला का?" मुग्धाच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या शब्दांनी खळबळ; मोलकरणीसमोरचा तो गौप्यस्फोट ठरला अखेरचा!


पुण्याजवळील गहुंजे येथील एका आलिशान सोसायटीत ३४ वर्षीय मुग्धा देशमुख या तरुणीचा संशयास्पद आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मुग्धा ही छत्रपती संभाजीनगरची मुळची रहिवासी होती.




ती MBA चं शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. मात्र दोन महिन्यांपूर्वी ती गुपचूप लंडनवरून भारतात परत आली. कुटुंबीयांना कसलीही कल्पना न देता ती पुण्यातील फ्लॅटवर राहत होती. ती सातत्याने कुटुंबीयांच्या संपर्कात होती. मात्र ती अजूनही लंडनमध्येच आहे, असा भास तिने निर्माण केला होता.

मोलकरीणने मुग्धाबाबत काय सांगितलं?

लंडनवरून परतलेल्या तरुणीचा अशाप्रकारे पुण्यातील फ्लॅटवर मृत्यू झाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. मुग्धा अचानक भारतात का आली? तिने याबाबत कुटुंबाला काहीच का सांगितलं नाही? तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत काही घातपात घडला? याची अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, पोलिसांनी मुग्धाच्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या मोलकरीणचा जबाब नोंदवला आहे. तिने मुग्धाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 



इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मुग्धाने मृत्यूपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी आपल्या मोलकरणीला पूर्ण महिन्याचा पगार देऊन कामावरून काढून टाकलं होतं. "मी इथून जाण्याचा प्लॅन करत आहे. तू उद्यापासून कामावर येऊ नको" असं मुग्धाने मोलकरीणला सांगितलं, अशी नवी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे.

लंडनवरून गुपचूप येऊन सोसायटीत एकटीच राहिली

मुग्धा देशमुख ही जुलै २०२५ मध्ये एमबीएचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेली होती. जवळपास वर्षभर लंडनला राहिल्यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये ती पालकांना कोणतीही कल्पना न देता गुपचूप लंडनहून भारतात परतली. भारतात आल्यानंतर देखील ती कुटुंबाच्या संपर्कात होती. आपण लंडनमध्येच असल्याचा भास तिने निर्माण केला होता.

शांत स्वभाव, कुणाला बोलायची नाही

तपासात समोर आलं की, मुग्धाने एप्रिल २०२६ मध्येच गहुंजे येथील हा फ्लॅट एका लष्करी अधिकाऱ्याकडून अधिकृत भाड्याने घेतला होता. मात्र ऑगस्ट २०२६ पासून ती या फ्लॅटवर राहायला आली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती अतिशय शांत स्वभावाची होती. ती कोणाशीही फारसं बोलत नसत. ती कधीतरी सोसायटीच्या गोल्फ कोर्सवर वॉकींग करताना दिसायची. पण तिचा कोणाशीही फारसा संपर्क नव्हता. मोलकरणीच्या मते, मुग्धा यांच्या घरात कधीही कोणतीही व्यक्ती किंवा गेस्ट आले नाहीत. ती स्वतः स्वयंपाक करायची किंवा काहीतरी ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागवत असत.




२८ ऑक्टोबर रोजी उघड झाली घटना; सीसीसीटीव्ही कॅमेरे बंद!

मुलीसोबत संपर्क तुटल्यानंतर मुग्धाच्या कुटुंबीयांनी लंडनमधील मुग्धाच्या मैत्रिणीला फोन केला. तेव्हा मुग्धा ऑगस्ट महिन्यातच भारतात आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे कुटुंबीयांनी मुग्धा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता तिचं शेवटचं लोकेशन पुण्यातील गहुंजे येथील फ्लॅटवर आढळलं. तसेच तिच्या बँक तपशीलानुसार तिने झोमॅटो, स्वीगी, ब्लिकीटवर ऑनलाईन पेमेंट केल्याचं देखील दिसून आलं.

दोन महिन्यांपासून सीसीटीव्ही बंद

या तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी मुग्धाचं लोकेशन शोधून काढलं. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं पथक गहुंजे येथील 'टावर ११' च्या फ्लॅट नंबर २३०७ वर पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी बनावट चावीने तो उघडला. तेव्हा मुग्धाचा मृतदेह बेडरूममध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तसोच ज्या भागात हा फ्लॅट आहे त्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचं निष्पन्न झालं. दोन महिन्यांपूर्वीच या फ्लॅटवर शिफ्ट मुग्धा शिफ्ट झाली होती. तेव्हापासूनच हे सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याने मुग्धाच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.