🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवेंद्र फडणवीसांना कोल्हापुरात मोठा धक्का? 'गोकुळ' हातातून जाऊ नये म्हणून सतेज पाटलांची तगडी तटबंदी!

देवेंद्र फडणवीसांना कोल्हापुरात मोठा धक्का? 'गोकुळ' हातातून जाऊ नये म्हणून सतेज पाटलांची तगडी तटबंदी!


सत्ताधारी महायुतीने संपूर्ण ताकद पणाला लावूनही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला  पराभव स्वीकारावा लागला होता.

काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील समविचारी पॅनलने 13-12 अशा फरकाने महायुतीच्या पॅनेलचा पराभव केला होता. समविचारी पॅनेलला काठावरचे बहुमत मिळाले असले तरी निवडणुकीपूर्वी सतेज पाटलांना फक्त चार जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात होता. तर महायुतीचे काही नेत्यांनी 25-0 अशा विजयाचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत सतेज पाटील यांनी महायुतीला अस्मान दाखवत 13 संचालक निवडून आणले होते. आता येत्या 29 ऑक्टोबरला गोकुळचे नवनिर्वाचित संचालक हे अध्यक्षाची निवड करणार आहेत. मात्र, गोकुळची सत्ता हस्तगत करु न शकलेल्या महायुतीकडून आता अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत डाव टाकला जाण्याची शक्यता आहे. 

गोकुळबाबत महायुतीचे नेते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांचा सल्ला घेण्याची शक्यता आहे. आज मुंबई राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक पार पडले. मंत्रिमंडळाच्या या बैठकीनंतर महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करतील, असे सांगितले जात आहे. अध्यक्ष निवड सभेला गैरहजर राहण्याबाबत महायुतीच्या नूतन संचालकांना अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार, गोकुळ अध्यक्षपदासाठी महायुती उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास गोकुळच्या निवडणुकीप्रमाणे अध्यक्षपदाची निवडणूकही रंगतदार होण्याची शक्यता आहे.

मात्र, सतेज पाटील यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीमध्ये महायुतीचे नेते सहकार्य करतील. माझी हसन मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रदीप नरके यांच्यासोबत चर्चा झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या संस्थापक चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या मुलाला अध्यक्ष करायचं स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे महायुतीचे नेते वेगळा निर्णय घेतील, असं वाटत नाही. शासन मान्य संचालक किंवा स्वीकृत संचालक यांना मतदान करता येत नाही. तसं झालं तर सहकार मधील निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही, असेही सतेज पाटील म्हणाले आहेत.

गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी, एका क्लिकवर-

सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे विजयी उमेदवार

शशिकांत पाटील चुयेकर
बाबासाहेब श्रीपती चौगले
अभिजित प्रभाकर ताईशेटे
किसन बापूसो चौगले
राहुल बजरंग देसाई
बाबासाहेब विष्णू देवकर
विश्वजित दिनकरराव जाधव
विद्याधर बाबूराव गुरबे
अंजना केदारी रेडेकर
भाग्यश्री धीरज डोंगळे
शशिकांत शामराव खोत
राजुबाबा जयवंतराव आवळे
बयाजी देवू शेळके


महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी

राजेश नरसिंगराव पाटील
राहुल पी. एन. पाटील
रणजित के. पी. पाटील
रणजित दिलीप पाटील
अंबरिशसिंह संजय घाटगे
चेतन अरुण नरके
अजित शशिकांत नरके
अजित पांडुरंग पाटील
वीरेंद्र संजय मंडलिक
युवराज दत्ताजीराव पाटील
मदन बाबूराव देसाई
अमर पाटील

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.