🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"सख्या मित्राला पिंजऱ्यात पाहून न्यायाधीश मैत्रिणीचे डोळे पाणावले; मैत्री आणि कर्तव्याच्या संघर्षाचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल!"

​"सख्या मित्राला पिंजऱ्यात पाहून न्यायाधीश मैत्रिणीचे डोळे पाणावले; मैत्री आणि कर्तव्याच्या संघर्षाचा हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल!"


अमेरिकेतील मियामी न्यायालयात न्यायाधीश मिंडी ग्लेझर यांच्यासमोर त्यांचा शाळेतील जुना मित्र आर्थर बूथ आरोपी म्हणून उभा राहिला. दोघेही एकत्र फुटबॉल खेळायचे. मित्राची अवस्था पाहून न्यायाधीश भावुक झाल्या. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 




हा व्हिडीओ पाहून खरंच तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. 'तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार' हे वाक्य तुम्ही ऐकलं असेल. याचा साधा अर्थ असा की, आपण घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृती यांमुळेच आपलं आयुष्य घडतं किंवा बिघडतं. याच विचाराची प्रचिती देणारा एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



अमेरिकेतील मियामी येथील न्यायालयात दोन जुन्या शालेय मित्रांची अनपेक्षित भेट झाली. दोघेही एकाच शाळेत शिकले होते आणि एकत्र फुटबॉलही खेळायचे. मात्र, काळाच्या ओघात त्यांच्या आयुष्याने पूर्णपणे वेगळी वळणं घेतली. एकेकाळचा मित्र गुन्ह्यांच्या आरोपाखाली न्यायालयात आरोपी म्हणून उभा होता, तर त्याची मैत्रीण न्यायाधीशाच्या खुर्चीवर विराजमान झाली होती.




आपल्या जुन्या मित्राला आरोपीच्या पिंजऱ्यात पाहून महिला न्यायाधीश भावुक झाल्या. शाळेतील आठवणींना उजाळा देत त्यांनी त्याच्याबद्दल खंत व्यक्त केली आणि त्याला या परिस्थितीत पाहून वाईट वाटत असल्याचं सांगितलं. न्यायाधीशांचे हे शब्द ऐकताच मित्राला अश्रू अनावर झाले आणि तो न्यायालयातच ढसाढसा रडू लागला. आयुष्यात घेतलेले निर्णय माणसाला कुठे घेऊन जाऊ शकतात, याची जाणीव करून देणारा हा प्रसंग अनेकांना भावूक करत आहे. त्यामुळेच या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मित्राला पाहून न्यायाधीशांना बसला धक्का!​

ही घटना अमेरिकेतील मियामी येथील न्यायालयात घडली. महिला न्यायाधीश मिंडी ग्लेझर यांच्यासमोर आरोपी म्हणून उभा असलेला आर्थर बूथ हा त्यांचा शाळेतील जुना मित्र होता. दोघेही नॉटिलस मिडल स्कूलमध्ये एकत्र शिकले होते. चोरी आणि इतर गुन्ह्यांच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. न्यायालयात त्याला पाहताच मिंडी ग्लेझर यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला ओळखलं आणि त्या आश्चर्यचकित झाल्या.




एकेकाळी शाळेत एकत्र शिकणारा आणि फुटबॉल खेळणारा मित्र आज आपल्याच न्यायालयात आरोपी म्हणून उभा असल्याचं पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या चेहऱ्यावरील भावांतून आश्चर्य आणि दुःख स्पष्टपणे जाणवत होतं. हा प्रसंग आर्थर बूथसाठीही अनपेक्षित होता. आपल्या जुन्या मैत्रिणीला न्यायाधीशाच्या खुर्चीवर पाहताच त्याच्या भावनांचा बांध फुटला आणि त्याला अश्रू अनावर झाले.

न्यायाधीश मिंडी ग्लेझर काय म्हणाल्या?

न्यायाधीश मिंडी ग्लेझर यांनी बूथ यांच्याशी बोलताना म्हटले, "तुला इथे पाहून मला खूप वाईट वाटतंय. तुझं पुढे काय झालं, याचा मी नेहमी विचार करायचे." बूथ तू शाळेत असताना अतिशय चांगला मुलगा होतास. चांगला फुटबॉल खेळायचास. मात्र, आयुष्यात घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयांमुळे तू आज न्यायालयात आरोपी म्हणून उभा आहेस. पण भविष्यात तू कायद्याचं पालन करशील आणि एक चांगलं आयुष्य जगशील, अशी आशा आहे. थोडक्यात, आपल्या मित्राची ही अवस्था पाहून त्या खूप भावुक झाल्या. पण त्यांनी आपल्या पदाचं भान ठेवत स्वत:च्या भावनांवर नियंत्रण ठेवलं.

अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे आयुष्य गेले वाया​

आर्थर बूथ यांची चुलत बहीण मेलिसा मिलर यांनी स्थानिक वृत्तवाहिनीला सांगितले की, बूथ यांच्यात आयुष्यात मोठे यश मिळवण्याची क्षमता होती. मात्र, अंमली पदार्थ आणि गुन्हेगारीमुळे त्यांचे आयुष्य भरकटले. बूथ हे हुशार विद्यार्थी होते. ते अभ्यासात चांगले होते, सर्वांगीण कौशल्य असलेले खेळाडू होते आणि त्यांना दोन भाषा बोलता येत होत्या, असेही मिलर यांनी सांगितले. न्यायाधीशांसमोर उभे राहिल्यानंतर बूथ यांना आपल्या भूतकाळाची आणि आयुष्यातील चुकीच्या निर्णयांची जाणीव झाल्यामुळे त्यांना लाज वाटत असावी, असेही त्यांच्या चुलत बहिणीने नमूद केले. असो, पण या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.