🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलनाचाण वणवा! अभिजीत दिपकेंसह सौरभ दास, रांका जामिनावर बाहेर; प्रशासनाची डोकेदुखी वाढणार?

दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलनाचाण वणवा! अभिजीत दिपकेंसह सौरभ दास, रांका जामिनावर बाहेर; प्रशासनाची डोकेदुखी वाढणार?


नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलनाची हाक देणाऱ्या सीजेपीच्या नेत्यांना पोलिसांनी काल ताब्यात घेण्यात होतं.अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची कार्यकारी न्याय दंडाधिकारी यांच्याकडून या तिघांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना या तिघांवरील कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आले आहेत. तिघांकडून कोणतं कृत्य घडलं होतं की त्यांना विमानात जाऊन ताब्यात घेण्यात आलं होतं, असा सवाल सुनावणीत विचारण्यात आला होता. कार्यकारी न्याय दंडाधिकाऱ्यांनी सीजेपीच्या नेत्यांना सोडण्याचे आदेश दिल्यानं दिल्ली पोलिसांना धक्का बसला आहे.

भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीनं आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका दिल्लीत दाखल होताच त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आज या अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका या तिघांना कार्यकारी न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. यावेळी अभिजीत दीपके यांच्या वकिलांनी कार्यकारी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर बाजू मांडण्यात आली. अभिजीत दीपके आंदोलन स्थळी गेले नव्हते, त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं नव्हतं, असा युक्तिवाद केला. कार्यकारी न्याय दंडाधिकाऱ्यांनी अखेर अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्याचे आदेश दिले. 

अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याकडून बेल बाँड तयार करुन घेण्याची भूमिका दिल्ली पोलिसांकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. दिल्ली पोलिसांकडून सुटका करण्यात आल्यानंतर अभिजीत दीपके, सौरव दास, आशुतोष रांका काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी जंतरमंतर परिसरात जाऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली. कार्यकारी न्याय दंडाधिकाऱ्यांनी प्रथम सीजेपीच्या तीन नेत्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून नेमक्या काय अटी घालण्यात आल्या आहेत ते स्पष्ट झालं नाही. प्राथमिक माहितीनुसार पुढील एक वर्ष शांतता भंग न करण्याच्या अटीवर सीजेपीच्या नेत्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती आहे. आता अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका आंदोलनाबाबत काय भूमिका जाहीर करतात ते पाहावं लागेल.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.