बऱ्याच जणांना जेवल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. अनहेल्दी पदार्थ खाण्याऐवजी काहीजण गूळ खाणं पसंत करतात. घरातील मोठ्या व्यक्तींनाही ही सवय असते.
कारण बाहेरचे केक्स, चॉकलेट्स किंवा इतर पदार्थ खाण्याऐवजी गूळ खाणं सोयीस्कर वाटतं. जेवणानंतर गूळ का खावा, गूळ खाल्ल्यानं शरीराला कोणते फायदे होतात समजून घेऊ. जेवणानंतर गूळ खाणं ही अत्यंत साधी, स्वस्त आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची असलेली सवय आहे.
जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं काय होतं?
१) हिमोग्लोबिनची कमतरता भासत नाही
गुळामध्ये आयर्नचं प्रमाण भरपूर असतं. पारंपारिक पद्धतीनं तयार केल्या जाणाऱ्या गुळात आयर्न जास्त असते. ज्या लोकांना एनिमिया आहे त्यांनी जेवणानंतर गूळ खायलाच हवा कारण तेव्हाच शरीरातील रेड ब्लड सेल्सची नवीन निर्मीती व्हायला चालना मिळते आणि शरीरातलं हिमोग्लोबीन नैसर्गिकरित्या वाढतं.
२) शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात
लिव्हरचं काम शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं असतं. जेवणानंतर गूळ खाण्याचा फायदा म्हणजे गूळ हा उत्तम नॅचरल डिटॉक्सिफायर आहे. जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं लिव्हरची कॅपिसिटी वाढते आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर पडायला मदत होते.
३) कॉन्स्टीपेशन आणि गॅसपासून आराम
पोट साफ न होण्याची समस्या आजकाल खूपजणांमध्ये असते. त्या लोकांसाठी गूळ हा एक उत्तम उपाय आहे. गूळामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. जेवणानंतर गूळ खाल्ल्यानं खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन व्हायला मदत होते आणि गॅसेसची समस्या कमी होते.
गूळ खाताना या गोष्टींची काळजी घ्या
जेवल्यानंतर गूळ नेहमी कमी प्रमाणात म्हणजेच ५ ते १० ग्रॅम असावं अति प्रमाणात गूळ खाल्ल्यानं शरीरात उष्णता वाढते. बाजारात मिळणणारा पिवळा गूळ सहसा केमिकल्सवापरून केलेला असतो. म्हणून शक्यतो काळा गूळ, केमिकल नसलेला सेंद्रीय गूळ निवडा.
जेवणानंतर गूळ खाणं ही जूनी परंपरा असून आरोग्यदायी सवय आहे महागड्या सप्लिमेंटस घेण्याऐवजी तुम्ही जेवणानंतर गूळ खाण्याची ही सवय लावली तर आजार दूर होण्यास मदत होईल तसंच शरीराला उर्जाही मिळेल. गूळ जास्त प्रमाणात न खाता कमी प्रमाणात खा. जर तुमचं वजन वाढलं असेल किंवा डायबिटीस असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.