🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"या कॉकरोचांना पळवून पळवून हाकलणार!" इंडिया आघाडीच्या मोर्च्यादरम्यान भाजप मंत्र्याचा जोरदार हल्लाबोल

​"या कॉकरोचांना पळवून पळवून हाकलणार!" इंडिया आघाडीच्या मोर्च्यादरम्यान भाजप मंत्र्याचा जोरदार हल्लाबोल


मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि SIR प्रक्रियेविरोधात विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने दिल्लीत काढलेल्या मोर्चावरून राजकारण तापताना दिसत आहे. विरोधकांच्या या आंदोलनावरून टीका करताना बिहार सरकारमधील भाजपचे मंत्री डॉ.दिलीप जायस्वाल यांनी विरोधकांची तुलना थेट 'कॉकरोच' अर्थात झुरळांशी केली आहे. ते मंगळवारी पाटणा येथे पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले दिलीप जायस्वाल? - इंडिया ब्लॉकच्या खासदारांच्या निषेध मोर्चावरून टीका करताना दिलीप जयस्वाल म्हणाले, "या देशात विरोधी पक्ष ज्या पद्धतीने अराजकता पसरवत आहेत, त्यासाठी देवही त्यांना कधी माफ करणार नाही. इंस्टाग्राम, फेसबुकच्या बळावर या देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करू नका. ज्या दिवशी या देशातील जनता जागृत होईल, त्या दिवशी या कॉकरोचना (झुरळांना) पळवून पळवून दाखवून देईल, की हा देश कॉकरोच आणि इंस्टाग्रामने नाही तर विचारधाराने चालतो."

"...हेच तर एसआयआर!" दिलीप जायस्वाल पुढे म्हणाले, "सोपी गोष्ट आहे,ज्या मतदाराचा मृत्यू झाला आहे, त्याचे नाव मतदार यादीतून हटायला हवे. ज्या मतदाराचे नाव दोन ठिकाणी असेल, त्याचे नाव एका ठिकाणावरून हटायला हवे. ज्या परिसरात एसआयआर राबवला जात आहे, तेथील लोक सांगत असतील, की गेल्या १० वर्षांत संबंधित नावाचा मतदारच नाही, तर अशा वेळी त्याचे नाव यादीतूक काढून टाकले जाईल. हेच तर एसआयआर आहे." 

सरकारला काम करू द्या - विरोधी पक्षांवर हल्ला चढवताना, "विरोधी पक्षांनी 'लंगटई'व उतरले आहेत. बिहारमध्ये म्हटले जाते, 'लंगटई' होणे. सत्तेची आतुरता आणि सत्तेपासूनचे अंतर त्याना या थराला घेऊन आले आहे. जनतेवर विश्वास ठेवा. लोकशाही आणि संविधानावर विश्वास ठेवा. २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत जनतेच्या जनादेशाने निवडून आलेल्या सरकारला काम करू द्या, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.