सांगली एलसीबीची धडक कारवाई! १६ वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी जेरबंद; सांगली शहर पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश
गुन्हेगारी जगतात खळबळ उडवून देणारी महत्त्वाची कामगिरी सांगली एलसीबी (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा) ने केली आहे. मा. न्यायालयाचे तब्बल ३ स्टॅण्डीग वॉरंट आणि गेल्या १६ वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देऊन फरारी असलेला रेकॉर्डवरील कुख्यात आरोपी तानाजी ऊर्फ महेश कृष्णा गायकवाड यास एलसीबीच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी व वॉरंट्स
सांगली शहर पोलीस ठाण्यात सन २०१० मध्ये गु.र.नं. ६०/२०१० नुसार भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ५०४, ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल होता. फिर्यादी मीना कृष्णा गायकवाड (रा. संजयनगर, शिंदे मळा, सांगली) यांनी ही तक्रार नोंदवली होती. दिनांक ३१ मार्च २०१० रोजी रात्री घडलेल्या या प्रकरणानंतर मुख्य आरोपी महेश गायकवाड हा गेल्या तब्बल १६ वर्षांपासून सतत परागंदा (फरारी) होता.
त्याच्यावर न्यायालयाकडून खालीलप्रमाणे ३ गंभीर स्टॅण्डीग वॉरंट जारी करण्यात आले होते:
१. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, सांगली यांचे कोर्टातील नियमित फौजदारी खटला नं. ३००२१८/२०१०
२. ८ वे न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, सांगली यांचे कोर्टातील आर.सी.सी. २५६/२०१३
३. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, सांगली यांचे कोर्टातील नियमित फौजदारी खटला नं. ३००४६५/२०१५
सांगली एलसीबी पथकाची धडक कारवाई आणि सापळा
मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हµयातील पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
या पथकातील अंमलदार रणजित जाधव, विनायक सनदी, अभिजीत माळकर आणि संकेत कानडे यांना गोपनीय बातमीदाराकडून अचूक माहिती मिळाली की, सांगली शहर पोलीस ठाण्याच्या स्टॅण्डीग वॉरंटमधील वाँटेड आरोपी महेश गायकवाड हा कुपवाडमधील कापसे प्लॉट परिसरा जवळील शिवकांचन मंगल कार्यालय परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून सांगली एलसीबीच्या पथकाने तात्काळ त्या परिसरात सापळा रचला. संशयितरित्या थांबलेल्या इसमाला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने आपले नाव तानाजी ऊर्फ महेश कृष्णा गायकवाड (वय ३६ वर्षे, रा. जुना बुधगाव रोड, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) असल्याचे सांगितले.
पुढील कारवाई
गेल्या १६ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अखेर सांगली एलसीबीच्या जाləयात अडकला असून, त्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.दरम्यान, सांगली एलसीबीने राबवलेल्या या व्यापक मोहिमेदरम्यान जिह्यल्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांतील ६ फरारी आणि तब्बल ३९ पाहिजे आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई सुरू आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.