🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"जरांगेंच्यानंतर राऊतांचा सकाळीच सुपडासाफ ‘बॉम्ब’! विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात खळबळ"

​"जरांगेंच्यानंतर राऊतांचा सकाळीच सुपडासाफ ‘बॉम्ब’! विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वर्तुळात खळबळ"


विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज राज्यात मतदान होत आहे. या निवडणुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निवडणुकीत महायुतीची सरशी होणार की महाविकास आघाडीची? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

राज्यात निवडणुकीची लगबग सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने मतदारांना प्रत्येकी 10-10 हजार रुपयांचं वाटप केलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. काल मनोज जरांगे यांनी मोठा बॉम्ब फोडल्यानंतर आता संजय राऊत यांनीही मीडियाशी बोलताना मोठा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे यांनी 500 कोटी रुपयांचा गौप्यस्फोट केला आहे. यातून एक स्पष्ट होतंय. शिंदे आणि फडणवीस हे एकमेकांवर तलवार चालवत आहे. यातून एका दगडात तीन पक्षी मारले आहेत. 




जरांगेंना बदनाम करायचं आणि फडणवीस आणि शिंदेंना गोत्यात आणायचं हा यामागचा हेतू आहे. ज्याने ऑडिओ क्लिप काढली त्याला माहीत आहे, मी तर मरणार आहे. पण तुला साथ घेऊन बुडणार. अशा पद्धतीचा हा खेळ सुरू आहे. दुष्काळावर कोणी बोलत नाही. पदवीधरांचे मत 10 हजाराला विकत घेतलं जात आहे. मतदारांना प्रत्येकी 10-10 हजार रुपये देण्यात आले आहेत. भाजपने हे दिले आहेत. पण शेतकऱ्यांना फक्त 5 हजार रुपये दिले जात आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात काल परवापासून प्रत्येकी 10 हजार रुपये वाटले जात आहेत. भाजपचे उमेदवार आहे, तिथे हे वाटप होत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

आम्ही त्यावर बोलायचं नाही का?

जे 500 कोटी जमा झाले आहेत, त्यातून मतं विकत घेणं, पक्ष विकत घेणं सुरू आहे. जरांगेंचं आंदोलन संपवण्यासाठी हा खेळ सुरू झाला आहे, असा दावाही राऊत यांनी केला आहे. आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो. पक्ष, आमदार खासदार आणि माणसंही, असं सत्ताधाऱ्यांना वाटत आहे. भाजप आणि शिंदे गटाकडे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे. आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्हाला चिरडलं जातं. आम्हाला तुरुंगात टाकलं जातं. त्यावर आम्ही बोलायचं नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

मोदी, शाह डरपोक हुकूमशाह

दिल्लीच्या बीकानेर हाऊसमधील प्रदर्शनातून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे चिरंजीव रेहान वाड्रा यांनी काढलेले फोटो हटवण्यात आले आहेत. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकार आंदोलनाला घाबरतंय. आता आंदोलनाच्या फोटोलाही सरकार घाबरत आहे. ही हिटलर टाइप सेन्सॉरशीप आहे. रेहान याने काही आंदोलनातील रिअॅक्शन त्याच्या कॅमेऱ्यात टिपल्या आहेत. अत्याचाराच्या आणि वेदनेच्या या रिअॅक्शन आहेत. ही कला आहे. जगात युद्ध झाले,. वर्ग कलह झाले. धार्मिक कलह झाले, त्या प्रत्येक ठिकाणी फोटोग्राफर पोहोचले होते. त्यांनी त्याचे फोटो काढले होते. अगदी गाजापट्टीतही फोटो काढून त्याचं प्रदर्शन भरवलं गेलंय. पण मोदी आणि शाह हे डरपोक हुकूमशाह आहेत. तरुण कलाकाराच्या फोटोला घाबरले आहेत, असा हल्लाच त्यांनी चढवला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.