🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शाहरुखच्या मॅनेजरचा मुंबईत मोठा धमाका! पूजा ददलानीने ३८ कोटींना खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; जाणून घ्या तिचा पगार अन् नेटवर्थ!

शाहरुखच्या मॅनेजरचा मुंबईत मोठा धमाका! पूजा ददलानीने ३८ कोटींना खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; जाणून घ्या तिचा पगार अन् नेटवर्थ!


शाहरुख खानची जितकी चर्चा होते. तितकीच त्याच्यासोबत सतत सावलीसारख्या दिसणाऱ्या पूजा ददलानीची सुद्धा होते. शाहरुखच्या आधी सुद्धा पूजा ददलानीने अनेक मोठमोठ्या स्टार्ससोबत काम केलय. पूजा ददलानी सुद्धा कमी श्रीमंत नाहीय.

पूजा ददलानीने आता मोठी इन्वेस्टमेंट केली आहे. तिने मुंबईत तीन अपार्टमेंट्स विकत घेतलेत. मुंबई देशातील एक श्रीमंत शहर आहे. इथे घर खरेदी करणं कोणासाठीही सोपं नाहीय. पूजा ददलानीने आपल्या करिअरमध्ये भरपूर पैसा कमावलाय. तिने 38 कोटी रुपयात मुंबईत 3 अपार्टमेंट्स विकत घेतलेत.

शाहरुखची मॅनेजर असलेल्या पूजा ददलानीने 1-2 नाही तब्बल 3-3 लग्जरी अपार्टमेंट्स विकत घेतलेत. ती अभिनेत्री नसली तरी तिचा स्टारडमही कमी नाहीय. पूजाची सुद्धा मोठी फॅन फॉलोइंग आहे. पूजा ददलानीच्या पगाराबद्दल बोलायचं झाल्यास रिपोर्ट्सनुसार तिला दर महिन्याला जवळपास 70 लाख रुपये पगार मिळतो. दुसरीकडे शाहरुख खानचा पर्सनल फंड्स रेड चिलीज आणि कोलकात नाइडरायडर्सला मॅनेज करण्यासाठी तिला 9 कोटीच्या आसपास रक्कम मिळते. ही खूप जास्त रक्कम आहे. पूजा ददलानीच्या नेटवर्थ बद्दल बोलायच झाल्यास तिची एकूण संपत्ती जवळपास 50 कोटीच्या आसपास आहे. मुंबईच्या वांद्रे भागात तिचं आलिशान घर आहे. हे घर शाहरुखची पत्नी गौरी खानने डिझाइन केलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.