🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​३ कोटींची फसवणूक, १० वर्षे फरारी; बँकेचा बनावट सातबारा बनवणारा मुख्य वाळव्याचा 'मास्टरमाइंड' अखेर पोलिसांच्या जाळ्यात!​

​३ कोटींची फसवणूक, १० वर्षे फरारी; बँकेचा बनावट सातबारा बनवणारा मुख्य वाळव्याचा 'मास्टरमाइंड' अखेर पोलिसांच्या जाळ्यात!​


​सांगली :- बँक ऑफ महाराष्ट्रची तब्बल ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची घसघशीत आर्थिक फसवणूक करून तब्बल ९ वर्ष १० महिने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकून परागंदा असलेला एक मोठा आर्थिक गुन्हेगार अखेर सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जाळ्यात अडकला आहे.



जमिनीचे खोटे सातबारे आणि बोगस शिक्क्यांचा खेळ रचून बँकेला चुना लावणारा हा पक्का खेळाडू गेल्या दशकापासून पोलिसांना गुंगारा देत होता. ​राजेंद्र रामचंद शिंदे (वय ५२, रा. हाळभाग, वाळवा, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव असून, या कारवाईमुळे सांगली जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.


​असा होता संपूर्ण बोगसगिरीचा खेळ!

​इस्लामपूर पोलीस ठाण्यात सन २०१७ मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याագրन (गु.र.नं. २७४/२०१७, भादविसं कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४) समोर आलेली ही हकिकत अत्यंत चक्रावून टाकणारी आहे. मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे याने अन्य ८० जणांसोबत कट रचून बँक ऑफ महाराष्ट्रच्या इस्लामपूर शाखेत अक्षरशः



दरोड्यासारखा प्रकार केला. आरोपींनी स्वतःच्या नावावर प्रत्यक्षात जमिनी कमी असताना अधिक जमिनी दाखवणारे खोटे व बोगस सातबारे उतारे तयार केले. काहींच्या नावावर इंचभरही जमीन नसताना जमिनीची बनावट कागदपत्रे आणि खोट्या शिक्क्यांचा वापर करून बँकेची तब्बल ३ कोटी २ लाख १४ हजार ८१८ रुपयांची धूळफेक केली आणि रकमा लाटल्या. हा गुन्हा उघडकीस आल्यापासून गेल्या ९ वर्ष १० महिन्यांपासून हा आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता.

​​१० वर्षांनंतर असा आवळला मुसक्यांचा आवळ्या

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र आणि सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी सांगली जिल्ह्यातील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर मोहीम हाती घेतली आहे. याच मोहिमेअंतर्गत आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक स्वाती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दीपक भांडवलकर, सपोफो रमेश कोळी, पोहेकॉ संदीप मोरे, विशाल भिसे व पोना सचिन मोरे यांचे पथक फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे हा रात्री-अपरात्री वाळवा येथील राहत्या घरी येत असल्याची पक्की खबर गोपनिय बातमीदारा मार्फत लागली.


 
क्षणाचाही विलंब न करता आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हाळभाग (वाळवा) येथील त्याच्या घरावर धाड टाकली. आरोपीला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता पहाटे ३ वाजून ८ मिनिटांनी त्याला जागीच बेड्या ठोकल्या. ​गेल्या १० वर्षांपासून खात्याला गुंगारा देणारा हा खतरनाक ठग सध्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोठडीत असून, सपोनि दीपक भांडवलकर या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास करत आहेत. बँकेच्या पैशांवर डल्ला मारून कायद्याला आव्हान देणाऱ्या अशा आर्थिक गुन्हेगारांवर सांगली पोलिसांनी पुन्हा एकदा पोलिसी हिसका दाखवून दणका दिला आहे. कितीही दिवस फरारी असला, तरी कायद्याचा हात लांबच असतो हे या कारवाईने पुन्हा सिद्ध केले आहे!
​


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.