🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

टायगर तर फक्त निमित्त! संपूर्ण सिनेसृष्टीला हादरवण्याचा होता कट; टॉपचे बॉलिवूड अभिनेते होते हिटलिस्टवर, रेकीनंतर ऐनवेळी बदलला प्लॅन!

टायगर तर फक्त निमित्त! संपूर्ण सिनेसृष्टीला हादरवण्याचा होता कट; टॉपचे बॉलिवूड अभिनेते होते हिटलिस्टवर, रेकीनंतर ऐनवेळी बदलला प्लॅन!


बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणाबाबत खळबळजनक आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुंबई गुन्हे शाखा आणि कोटा पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

टायगर श्रॉफवर हल्ला करण्यापूर्वी या हल्लेखोरांच्या निशाण्यावर महानायक अमिताभ बच्चन, आमीर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्यासह अनेक मोठे स्टार होते. मात्र, त्यांच्या घराबाहेरील कडक सुरक्षा व्यवस्था पाहून आरोपींनी आपला प्लॅन बदलल्याची माहिती समोर आली आहे.

टायगर श्रॉफवर का हल्ला झाला?

आरोपींनी (रिहान, ऋतिक आणि फूल सिंह) टायगर श्रॉफवर हल्ला करण्याआधी अमिताभ बच्चन, अमीर खान, अक्षय कुमार आणि सलमान खानच्या घरांची रेकी केली होती. त्याचे व्हिडिओ लॉरेन्स गँगचा हँडलर अनिल पंडित याला पाठवले होते. मात्र, तेथील कडक सुरक्षा पाहिल्यानंतर त्यांनी हा प्लॅन सोडून दिला आणि कमी सुरक्षा असलेल्या प्रसिद्ध स्टारचा शोध सुरू केला. 




याच आधारावर त्यांनी टायगर श्रॉफला लक्ष्य म्हणून निवडले. टायगर हा दर रविवारी सायंकाळी फुटबॉल खेळायला येतो आणि त्याच्यासोबत फक्त ड्रायव्हर असतो, याची माहिती त्यांना मिळाली होती. सलग ७ दिवस रेकी केल्यानंतर रविवारी आरोपी तिथे पोहोचले आणि त्यांनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. 

आरोपींनी गुगलवरून टायगरची माहिती काढली होती आणि ठरवले होते की सेल्फी घेण्याच्या बहाण्याने कारजवळ पोहोचून गोळीबार करतील, मात्र पार्कबाहेर गर्दी असल्यामुळे त्यांनी थेट गोळीबार केला. विशेष म्हणजे, यांच्यासोबत चौथा साथीदारही होता, पण तो हल्ल्याच्या एक रात्र आधी सिगारेट ओढण्याच्या बहाण्याने घाबरून पळून गेला होता.

ट्रेनने शस्त्रे पोहोचवणारे ४ जण दिल्ली पोलिसांकडून अटक

टायगरवर गोळीबार करण्यासाठी शूटर्सपर्यंत शस्त्रे पोहोचवल्याच्या गंभीर आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. यामध्ये सोनीपतचा कुणाल (२१), सुमित (१९), राधा (२३) व बबिता (२३) यांचा समावेश आहे. राधा व बबिता या दोघी महिला ट्रेनमधून प्राणघातक हत्यारे घेऊन मुंबईला गेल्या होत्या. तिथे त्यांनी ती शस्त्रे लॉरेन्स टोळीच्या हँडलरकडे सोपवून त्या परतत असताना त्यांना अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी ३ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मिळवला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील कसून तपास सुरू आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.