🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नियतीचा क्रूर खेळ! शहीद जवानाच्या पार्थिवासह जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात, मुलासह चौघे जागीच ठार

नियतीचा क्रूर खेळ! शहीद जवानाच्या पार्थिवासह जाणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात, मुलासह चौघे जागीच ठार


चंदीगडहून शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव मूळ गावी देवरिया येथे घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. हलियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किलोमीटर ७९.६ जवळ एका अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात शहीद जवानाचा मुलगा, चालक आणि दोन नातेवाइकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहीद जवानाच्या अंत्यदर्शनापूर्वीच कुटुंबातील मुलासह अन्य सदस्यांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

अज्ञात वाहनाची धडक; मुलगा आणि चालकाचा जागीच मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ८:१५ वाजता रुग्णवाहिका शहीद सुभेदार मेजर सत्यवान (रा. गैला दुधिला, ता. रुद्रपूर, जि. देवरिया) यांचे पार्थिव घेऊन चंदीगडहून गावाकडे निघाली होती. पूर्वांचल एक्स्प्रेसवेवरील किमी ७९.६ जवळ एका भरधाव अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या धडकेत शहिदांचा मुलगा गौरव सिंह आणि रुग्णवाहिका चालक जसपाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

उपचारादरम्यान दोघांनी प्राण सोडले अपघातात शहिद जवानाचे भाऊ राजन चौधरी आणि पुतण्या राम समुझ सिंह गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी त्यांना तातडीने पिठला कुमारगंज येथील रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान या दोघांचीही प्राणज्योत मालवली. एकाच वेळी कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहिदांचे पार्थिव सुरक्षित; पोलिसांकडून तपास सुरू अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. शहीद सुभेदार मेजर सत्यवान यांचे पार्थिव स्थानिक पोलीस ठाण्यात पूर्ण सन्मानासह सुरक्षित ठेवण्यात आले आहे. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.