🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सौदी अरेबिया हादरला! मशिदीतच घातला घात; बांगलादेशी जोडप्याला थेट फाशीची शिक्षा, जगभरात उडाली खळबळ!

सौदी अरेबिया हादरला! मशिदीतच घातला घात; बांगलादेशी जोडप्याला थेट फाशीची शिक्षा, जगभरात उडाली खळबळ!


सौदी अरबमधील पवित्र शहर असलेल्या मक्कामधील एका मशिदीत अनैतिक कृत्य केल्याप्रकरणी दोन बांगलादेशी नागरिकांना गुप्तरित्या फाशीची शिक्षा देण्यात आल्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि राजकीय वाद निर्माण झाला आहे.

सौदी अरबच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबरला नजरुल इस्लाम अब्दुल बासिर आणि सिती अख्तर नावाच्या दोन बांगलादेशी नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली, पण सौदी अधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही विस्तृत माहिती सार्वजनिक केली नाही. या जोडप्याने मशिदीमध्ये अनैतिक वर्तन केलं, एवढंच सौदीकडून सांगण्यात आलं.

सौदी मीडिया आणि सोशल मीडियावर या दोघांनी मशिदीमध्ये एकमेकांचं चुंबन घेतलं, त्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे, पण या दोघांनी मशिदीमध्ये नेमकं कोणतं कृत्य केलं? याबाबत सौदी अरबकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दोन्ही बांगलादेशी नागरिकांना इस्लामी कायदा 'ताजीर' अनुसार मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यात गुन्ह्याचं गांभीर्य आणि शिक्षा निश्चित करणं न्यायाधिशाच्या विवेकावर अवलंबून असतं.

ढाक्यामध्ये खळबळ, बांगलादेशचा आक्षेप

सौदी अरबकडून कोणताही माहिती न देता बांगलादेशी नागरिकांना फाशीची शिक्षा दिल्यामुळे बांगलादेशमधील तारिक कहमान सरकारने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. बांगलादेशच्या परदेश राज्य मंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मृत्यूदंडाच्या या शिक्षेबाबत बांगलादेश सरकारला कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नव्हती, सरकारला ही माहिती मीडिया रिपोर्ट्समधून मिळाली, असं बांगलादेश सरकारकडून सांगण्यात आलं आहे. बांगलादेशी परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणानंतर ढाक्यामध्ये असलेले सौदी अरबचे राजदूत अब्दुल्ला जाफर एच बिन अबियाह यांना याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे, तसंच व्हर्बल नोटही पाठवली आहे. 




व्हिएना कनव्हेन्शनचं उल्लंघन?

बांगलादेशचे परराष्ट्र राज्य मंत्री हुमायूं कबीर यांनी ही कारवाई अत्यंत निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही देशांनी व्हिएना कनव्हेन्शन ऑन कॉन्स्युलर रिलेशन्सवर हस्ताक्षर केलं आहे, व्हिएना कनव्हेन्शन अंतर्गत नागरिकांना अटक आणि मृत्यूची माहिती देणं दोन्ही देशांना बंधनकारक आहे, असं असतानाही सूचना का दिली गेली नाही? असा प्रश्न बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी विचारला आहे.

मस्जिद अल-हरममध्ये सफाई कर्मचारी होता नजरुल

सौदी अरबमधून मिळालेल्या मर्यादित माहितीच्या अनुसार, फाशी झालेला नजरुल इस्लाम बांगलादेशच्या चट्टग्राम संभागमधील ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील रहिवासी होता. नोव्हेंबर 2022 मध्ये तो सौदी अरबमध्ये आला होता आणि मक्कामधील मस्जिद अल-हरममध्ये सफाई कर्मचाऱ्याचं काम करत होता. सौदी पोलिसांनी नजरुलला तो सौदीमध्ये आल्यानंतर 8 महिन्यांमध्येच अटक केली होती, असं नजरुलच्या कुटुंबाने सांगितलं. अटक केल्यानंतर तो जेलमध्येच होता. नजरुलचे वडील अब्दुल बासिर यांनी या खटल्याच्या निष्पक्षतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

'जर माझ्या मुलाचा मृत्यू कोणत्याही ठोस कारणाशिवाय झाला असेल तर मला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही सिती अख्तरला ओळखत नाही', असं नजरुलच्या वडिलांनी सांगितलं आहे. सितीसोबत नजरुलचं लग्न झाल्याचा दावाही कुटुंबाने फेटाळून लावला आहे. नजरुलला फाशी झाल्यानंतर नजरुलची 65 वर्षीय काकू आबेदा बेगम बेशुद्ध पडली आणि तिचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला वाद

सौदीमध्ये अशाप्रकारे दोघांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेशीर तज्ज्ञांनी सौदी अरबच्या गुप्त न्याय प्रक्रियेवर टीका केली आहे. व्हिएना कनव्हेन्शनच्या कलम 36 आणि 37 चा दाखला देत परदेशी नागरिक असलेल्या आरोपीला त्याच्या कायदेशीर अधिकारांपासून वंचित ठेवलं गेलं. कुटुंब आणि दूतावासाला सूचना न देता शिक्षा दिली गेली, असं सांगत मानवाधिकार संघटनांनी सौदीमधल्या या प्रकरणावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मानवाधिकार संघटना ह्युमन राईट्स वॉच नुसार सौदी अरबमध्ये 2025 या एकाच वर्षात कमीत कमी 356 लोकांना फाशीची शिक्षा दिली गेली, ज्यातील बहुतेक जण परदेशी नागरिक होते.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.