🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॅप्टन बेशुद्ध, प्लेन क्रॅशचा धोका! फक्त एका लहान मुलीच्या टॉयलेट ब्रेकमुळे वाचला १७४ जणांचा जीव

कॅप्टन बेशुद्ध, प्लेन क्रॅशचा धोका! फक्त एका लहान मुलीच्या टॉयलेट ब्रेकमुळे वाचला १७४ जणांचा जीव


तेल अविव: दुबईहून तेल अविवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानाचं अपहरण करून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाला. पण भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांनी को-पायलटचा हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही अनर्थ टाळला.

स्मित यांनी अतुलनीय धाडस आणि प्रसंगावधान राखलं. त्यामुळे १७४ प्रवाशांचा जीव वाचला. स्मित यांच्या शौर्याचं कौतुक जगभरातून होत आहे. भारतासह इस्रायल, अमेरिका, रशियाच्या पंतप्रधान आणि अध्यक्षांनी त्यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षान केला आहे.

को-पायलटनं विमानाचा अपघात घडवण्याच्या हेतूनं स्मित मच्छार यांच्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार केले. त्यात स्ंमित गंभीर जखमी झाले. त्यांचा रक्तदाब कमी झाला. बराच रक्तस्राव झाल्यानं हळूहळू त्यांची शुद्ध हरपू लागली. त्याही परिस्थितीत त्यांनी समयसूचकता दाखवली आणि कॉकपिटचं दार उघडलं. त्यामुळे विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांना आत प्रवेश करून हल्लेखोराला पकडता आलं नाही. या सगळ्या घडामोडींमध्ये ६ वर्षांच्या नीना मानेसची भूमिका महत्त्वाची ठरली. 
नीना मानेस तेल अविवला निघालेल्या विमानातून प्रवास करत होती. आई टाली सोबत नीना स्वच्छतागृहात गेली होती. त्याच सुमारास को-पायलट भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला करत होता. नीनाची आई तिला स्वच्छतागृहाजवळ घेऊन गेली. तेव्हा तिनं कॉकपिटमधून किंचाळण्याचा, ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर नीनाच्या आईनं वेळ न दवडता अलार्म वाजवला. त्यामुळे केबिन क्रू कॉकपिटच्या दिशेनं धावले.

नीनाची आई टाली मानेसनं इस्रायलच्या चॅनल १२ ला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 'कॉकपिटमध्ये सर्वत्र रक्त सांडलेलं होतं. पायलट आणि को-पायलटमध्ये जोरदार संघर्ष झाला. मी जोरात ओरडले. पायलटवर चाकू हल्ला होत असल्याचं म्हणत आरडाओरडा केला. मदतीसाठी साद घातली. प्रवासी माझ्याकडे पाहू लागले. गंभीर जखमी असलेल्या कॅप्टननं अखेर कॉकपिटचं दार उघडलं. त्यामुळे प्रवाशांना आत जाता आलं आणि हल्लेखोराला रोखून धरता आलं,' असं टाली यांनी सांगितलं.
कॉकपिटमध्ये संघर्ष सुरू असताना विमान अवघ्या ९० सेकंदांमध्ये तब्बल १७ हजार फूट खाली आलं. नीनाचे वडील ज्विका मानेस लेकीचा आक्रोश ऐकून कॉकपिटच्या दिशेनं धावले. ज्विका यांच्या सोबत आणखी दोघे कॉकपिटमध्ये शिरले आणि त्यांनी हल्लेखोराला रोखलं. त्याला बांधून ठेवलं. प्रवाशांनी जखमी स्मित यांनाही मदत केली. सुदैवानं विमानात दोन ऑफ ड्युटी पायलट होते. त्यांनी सुत्रं हाती घेत विमान सौदी अरेबियात सुरक्षितरित्या उतरवलं.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.